पान:बाबुर.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ बाबुर ^^^^^^ आनंद वाटला. तैमूरच्या सिंहासनावर त्याची स्थापना झाली. भालदारू ललकारले, सैनिकांनी कुर्निसात केले तेव्हां त्यास कृतकृत्य वाटले.. समरकंद म्हणजे भू-लोकावरील दुसरे नंदनवनच. तेथील ते लांबच लांब पसरलेले भव्य आणि सुंदर बगीचे, टोलेजंग इमारती, तैमूरची विशाल मशीद, ज्योतिषशास्त्रास लागणाच्या सर्व उपकारणांनी सज्ज अशी उलुघ बेगनें बांधलेली तीन, मजली उत्तुंग वेधशाला कोहिकच्या रम्य टेकडीवरून समरकंदच्या सौंदर्यावर दृष्टिक्षेप करीत होती. तर याच टेकडीच्या पायथ्याशी अल् अमीदाच्या गोंडस उद्यानाच्या मध्यभागी गगनाशी गोष्टी करणारा चाळीस-खांची उंचच उंच मनोरा उभा होता. त्याच्याच शेजारी सुट्टीच्या दिवशी मौजेने फिरण्यास आलेल्या लोकांची आपल्या चमत्काराने तहान-भूक हरपण्यास लावणारा, विजापूरच्या गोलघुमटाप्रमाणे एक घुमट पण उभा होता. अशा किती तरी अजब चिजांनी समरकंद शहर समृद्ध होते. त्या ठिकाणी कलावंतांच्या कलाकुसरीच्या चिजांची रेलचेल होती. दुधांत साखर पडावी त्याप्रमाणे हा अपूर्व योग बाबुरास लाभला होता आणि त्याचे दिवस आनंदांत चालले होते; पण हा सुखाचा काल अवघा शंभर दिवस टिकला.