पान:बाबुर.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समरकंदवर चाल ३३ आकस्मिकपणे हा प्रकार झाला त्यामुळे त्यास फार वाईट वाटले. निरपराधी नागरिकांना पोंचलेल्या या उपसगने बाबुराचे मन बेचैन झाले. त्याने सैनिकांचा रणमद ओसरू दिला व एक दिवस असा हुकूम काढला की, ज्या कोणीं जें कांहीं लुटले असेल ते सर्व जसेच्या तसे परत करावे. सुतळीचा तोडासुद्धा आपल्याजवळ ठेवू नये. बाबुराच्या या आज्ञेचा जादूसारखा उपयोग झाला. सर्वांच्या सर्व वस्तू जशाच्यातशा ज्याच्या त्यास माघारीं मिळाल्या. चौदा वर्षांचा सेनानी असा विचित्र हुकूम देतो काय आणि त्याची अंमलबजावणी इतक्या व्यवस्थितपणे होते काय ! हा एक मोठा अजब चमत्कार झाला समरकंदच्या लोकांना यांत मोठी अपूर्वाई वाटली. त्यामुळे बाबुराविषयी आपलेपणा वाटणारे लोक त्याच्याभोंवतीं सहजच जमा झाले. दिवसानुदिवस लोकांचा घोळका वाढू लागला आणि बाबुराची छावणो समरकंद शहराशीं - स्पर्धा करू लागली, इतक्यांत पूर्वीच्या महंमदाच्या मुलाने-बैसंगरने बाबुरवर चालून घेतले आणि परिणामकारक प्रतिकाराला सुरुवात केली. याच सुमारास तुर्कस्तानचा सुभेदार शैबानिखान यानेही आपले लोक आणून बाबुरास हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर ते आनंदी वातावरण पार पालटून गेले. तेथे रक्तांचे पाट वाहून प्रेतांचे खच पडू लागले. ही कचाकची पांच-सहा महिने चालली होती. बाबुरापुढे त्यांचा टिकाव लागेना, तेव्हां शैबानिखान माघारी फिरला. समरकंदभवती बाबुराची चिकाटी अशी जबरदस्त बसली की बैसंगरची रसद ठार झाली. त्याबरोबर उपासमारीने कहर केला. सैन्य अन्नपाण्यावांचून मरू लागले. त्यांची पोटें भकाटीस गेलीं. गोळाभर अन्न नाहीं की अंगाला धडूत नाही, अशी प्राणान्तिक अवस्था झाली. बाबुरापुढे आपला निभाव लागत नाही असे ठरले तेव्हां एके दिवशी रातोरात बैसंगर आपल्या दोनतीनशे मरतुकड्या लोकांनिश पळून गेला. शत्रु अशा त-हेने पळून गेल्यानंतर बाबुराने समरकंदमध्ये मोठ्या थाटानें प्रवेश केला. फारा दिवसांची महत्त्वाकांक्षा तडीस गेल्याने त्यास निरतिशय