पान:बाबुर.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समरकंदवर चाल कोहिक नदीच्या भव्य पात्रांत सुलतान अल्ली आणि बाबुर यांची घोड्यांवर भेट झाली. ती भेट म्हणजे भेटच होती. ती त्या ठिकाणीच विसर्जित होऊन नदीच्या प्रवाहाबरोबर त्या भेटीतील करार-मदार व बोलणीं वहात गेली. समरकंदवर स्वारी करण्याचा बेत झाला; पण त्याचे रूपांतर कृतींत कोठेच झाले नाही व ते होणारही नव्हते, कारण बेत करणारांत आत्मीयता नव्हती. तो करार एकमेकांनी आपले हातचे बाजूला ठेवून केला होता. बाबुराचे मात्र तसे नव्हते. तो स्वतः समरकंदवर स्वारी करणार होता. त्याप्रमाणे तो इ. स. १४९७ मेमध्ये या स्वारीवर निघाला. सुलतान अल्ली त्याच्या मदतीस आला नाहीं, व हे अपेक्षेप्रमाणेच झाले. त्याला त्यांत वावगे असे काहीही वाटले नाही. त्याने ही स्वारी स्वतःच्या शिरावर घेतली होती, आणि ती तडीस नेण्याचे सामर्थ्यहि त्यांच्या अंगांत होते. प्रथम त्याने आपला तळ त्या शहराशेजारी टाकला. त्यामुळे शहरवासीय घाबरले व त्यांच्यांत गडबड उडाली असे कांहींच झाले नाही. सर्व वातावरण अगदी शांत होते. इतकेच काय पण तेथील व्यापारी त्या सैन्याबरोबर देवघेवीची व्यवहार करू लागले. असा एकंदर प्रकार खेळीमेळीचा चालला असतो एकाएकी एक दिवस गडबड उडाली आणि बाबुराच्या सैन्याने सर्वे शहरभर धुमाकूळ घातला, लूटमार केली. सैनिकांचे हैं करणें बाबुरास आवडलें नाहीं. ३