पान:बाबुर.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समरकंद wwwwww आणि दारूड्या ही सर्व विशेषणे त्यास विशेषेकरून लागू होती. त्यामुळे त्याचे राज्य म्हणजे यमपुरी आणि त्याचा दरबार म्हणजे सैतानाचा दरबार झाला होता. नागडे-उघडे बीभत्स प्रकार नेहमी राजरोसपणे चालत. राजा असला नादान असल्याकारणाने ज्याला जे सांपडेल तें तो लांबवी. कसल्याहि गोष्टीची सुरक्षितता नव्हती. बायोलेंकरांवर जुलूम-जबरदस्ती केव्हां होईल याचा नेम नसे. अब्रू व पैका यांपैकी कांहींहि सुरक्षित नव्हते. जो तो आपल्या ठिकाणी त्रस्त व संतप्त होता. महंमदखानाची सहाच महिन्यांची कारकीर्द समरकंदच्या लोकांना चांगलीच जाणवली आणि आता कसे होईल या फिकीरीत सर्व लोक होते. तोंच देवाने त्यांचे गव्हाणे ऐकलें, खान वारला, त्याबरोबर लोकांना हायसे वाटले. महंमदखानाचा त्रास चुकला, पण सिंहासनाकरितां चाललेल्या भाऊबंदकीची झळ जनतेला पाँचत होती. समरकंदचे सिंहासन रिकामें होतांच पुन्हां त्यासाठी लांडगेतोड सुरू झाली. इ. स. १४९५ त समरकंदवर चौघांकडून चार स्वाच्या होण्याचा रंग दिसू लागला. हिरातहून सुलतान हुसेन निघाला. महंमदाचा एक मुलगा सुलतान अल्ली हिसारहून समरकंदची वाट चालू लागला. तिसरा बुखाच्याहून आणि चौथा बाबुर हा अंदजानहून असे चौघेजण चार ठिकाणांहून मोठ्या हिरीरीने निघाले. आतां भयंकर रणकंदन माजणार आणि त्यांत समरकंदचे वाटोळे होणार असे सवसच वाटू लागले; पण झाले मात्र अगदी निराळे. हे गडगडणारे मेघ पार वितळून गेले. टिलसिट या ठिकाणी त्या चौघांत तह झाला आणि जो तो आपला मार्ग आक्रमू लागला. तरी पण कोहिक नदीत बाबुर आणि सुलतान अल्ली या दोघांनी मिळून पुनः समरकंदवर स्वारी करण्याचा करार केला; पण हा करार म्हणजे नुसता पोषाखी होता, कारण हे दोन चुलत बंधू एकमेकांस भेटले तेच मुळीं घोड्यांवर; त्यांत एकमेकांविषय आपलेपणा मुळीच नव्हता.