पान:बाबुर.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समरकंद समरकंदचा बादशहा होणे ही बाबुराची महत्वाकांक्षा एकसारखी बळावत होती. स्वतःच्या राज्यांत तंटे-बखेडे चालू होते, पण महत्त्वाकांक्षी विचार त्याच्या डोक्यांतून.केव्हांच मावळले नाहीत. जरा स्थिरस्थावर झालें की हैं। ध्येय साधण्यासाठी तो उद्योगास लागे, मागे फवना प्रान्त सर करण्यासाठी आलेला बाबुराचा सर्वात मोठा चुलता अहंमदखान समरकंदकडे जातांना वाटेतच गतप्राण झाला. ही बातमी कळतांच बाबुराचे समरकंदचे सुखस्वप्न पुन्हां मूर्त स्वरूप धारण करू लागले. पण समरकंदचे तख्त रिकामें थोडेच होते ! अहंमदखानानंतर ते त्याच्या चुलत्याने-महंमद मिझने काबीज केलें होते आणि त्याची राजवट सुरू होती. पण हा राजवदल समरकंदच्या रयतेला चांगलाच जाणवू लागला. पूर्वीचा सुलतान अहमद एक नंबरचा दारूबाज होता. दारूच्या निशेत तो अनन्वित अत्याचार करी; तथापि एका दारूड्याच्या अत्याचारापलीकडे त्याचा त्रास रयतेस फारसा नव्हता. पण महंमद मिझ म्हणजे एक निराळीच व्यक्ति होती. तो इरसाल सैतान होता ! त्याला नीतिबंधने कोणत्याच प्रकारची नव्हती. तो कोणाचाही कोणत्याही तव्हेनें गळा कापी. त्याला स्वकीय आणि परकीय सारखेच. जिगरदोस्त व हाडवैरी हा फरक त्याच्या जवळ नव्हता. जुलमी, खुनी, विश्वासघातकी, व्यभिचारी