पान:बाबुर.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाल-राजा २९ रवाना केले. अत्यंत विश्वासांतील माणसाने असा दगा दिल्या कारणाने बाबुरास चांगलाच धक्का बसला व त्याने यापुढे कोणावरही विश्वास ठेवण्याचे सोडून दिले. तो खाण्यापिण्याचे पदार्थ तपासू लागला. इतकेंच काय पण खान्याचे चाकू, चमचे, काटे, यांच्यावरसुद्धा त्याने करडी नजर ठेविली. धार्मिक आचार व देव-देवतार्चन तो मोठ्या शिस्तीने पाळू लागला. मध्यरात्रीच्या प्रार्थना फारच क्वचित् वेळां तो चुकवीत असे. या सर्व गोष्टींचा पारणाम असा झाला की, त्याच्या चित्तवृत्ती धीर-गंभीर बनल्या. कसल्याहि घनघोर प्रसंगी त्याचे मनोधैर्य खचलें नाहीं.