पान:बाबुर.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ बाबुर त्यांची मर्जी संभाळणे म्हणजे फार मोठी कठीण गोष्ट होती. नेहमीं राजमंडळास राजाची मर्जी संभाळणे अशक्य पण अवश्य असते; पण येथे प्रकार उलटा होता. राजा राजमंडळाची मर्जी संभाळतां-संभाळता हैराण झाला होता. त्याचे सरदार लोक अत्यंत बदमाष होते. केव्हां कोण काय करील आणि कसा गळा कापील याचा नेम नव्हता. बाबुरापासून निघून जाण्यास त्यांना अल्पसे कारण बस्स होत असे. त्याच्या वडिलाच्या वेळच्या सर्व सरदारांनी त्यास सोडून दिले तरी पण बाबुर घाबरला नाही. त्यांच्या जागा त्याने नव्या सरदारांची भरती करून भरून काढल्या. बाबुर नुकताच गादीवर बसला होता, लाळघोट्या लोकांचे कड्याळ त्याच्याभोंवतीं जमा झाले होते. बाबुराची थोबाडभर स्तुति करण्यांत अहमहमिका लागली होती. तेव्हां सापाच्या शेपटीप्रमाणे वळवळणाच्या जिभेच्या शेंड्यावर अमृत आणि अंतःकरणांत हालाहल बाळगणारे प्राणी कोण आणि पाक दिलाचे कोण हे उमगणे कठीण होते. बाबुराने त्या मंडळींतून हसन याकूब या नांवाच्या एका गृहस्थास आपला मुख्य दिवाण नेमले. बाबुर लहान असल्यामुळे त्याच्या हाती सर्व सत्ता केंद्रित झाली. तो बोलेल ते धोरण आणि बांधील तें तोरण असे झाले. अशा स्थितीत हसन याकूबला राजकारण करण्याचे कांहीच कारण नव्हते; पण त्याने बाबुरच्या धाकट्या भावास-जहांगिरास गादीवर बसविण्याचे कारस्थान शिजविलें. जहांगिर गादीवर आल्यास आपणास मुक्त हस्ताने सर्व सत्ता वापरता येईल अशी त्याची कल्पना होती; पण हे सर्व राजकारण करतांना तो हे विसरला होता की, त्याला बाबुराच्या आजीशीं-इसान दौलत बेगमश हे खेळ खेळावयाचे होते. इसान दौलत बेगमला ह्या कपटकारस्थानाची बातमी लागताच तिने बंदोबस्तास सुरवात केली. हे राजकारण आपल्या अंगावर बेतणार असे कळतांच हसन याकू समरकंदकडे पळून गेला. तो जातांना वाटेत किरकोळ चकमक झाल्या; त्यांत त्यास त्याच्याच लोकांनी सोडलेल्या एका बाणाने पैगंबराच्या भेटीस