पान:बाबुर.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाल राजा स्वराज्याच्या सरहद्दीवर शत्रूचा गराडा एकसारखा भेडसावीत असतां ह्या बारा वर्षांच्या बाल-राजाने कसा राज्यकारभार हांकला असेल हा विचारच मोठा मौजेचा वाटतो. अठरा कारखाने आणि त्या कारखान्यांचे प्रमुख यांना या पोराची काय कदर वाटत असेल ? अष्टप्रधानांच्या वाटाघाटींत हा कोणत्या सूचना करीत असेल आणि कसा भाग घेत असेल याची कल्पनाच होत नाही. पण ज्या ठिकाणी आपली कल्पना कुंठित होते त्याच ठिकाणी या बारक्या बाबुराने प्रत्यक्ष काम केले आहे. बाल-बाबुराचे स्वरूप मोठे गोंडस होते. तो राजबिंडा होता, पापभिरू आणि सत्शील होता. त्याच्या चेह-यावर एक तहेचे पावित्र्य चमके. त्याचा स्वभाव गोड होता. त्याच्याजवळ अशी कांहीं जादू होती की तो कोणासही क्षणभर भारून टाकी. हे त्याचे गुणविशेष त्याच्या आयुष्यभर त्यास उपयोगी पडले. बाबुराची एक जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती आणि ती त्याने आपल्या बालपणापासून उराशी बाळगली होती. ती म्हणजे समरकंदचे राज्य जिंकून तेथील तैमूरच्या सिंहासनावर अधिष्ठित राजा म्हणून राज्य करावयाचे. फर्घाना प्रान्ताची राजधानी दिजान येथे बाबुर होता आणि या ठिकाणाहून ब्याची सर्व सूत्रे हालत होती. बाबुराचे राजमंडळ म्हणजे राजमंडळच होते.