पान:बाबुर.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर केली. युनुसखान माझा पति जिवंत असतां माझे दुस-याबरोबर लग्न लावण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी माझा पात होऊ पाहणा-या त्या माणसाची खांडोळी उडविली. जमालने फार तर माझा प्राण घ्यावा, पण असला "पाणचटपणा करू नये. या बाणेदार उत्तराने शेख जमालच्या मनावर फारच चांगला परिणाम झाला. त्याने इसान दौलतला मोठ्या मानाने पतिसानिध नेऊन ठेविले. त्या ठिकाणी हे जोडपें एक वर्षभर तुरुंगांत होते. नंतर त्यांची सुटका झाली. ह्याच इसान दौलतच्या धैर्याची दौलत बाबुरास आपत्तीच्या प्रसंग मनमुराद उपयोगी पडली. त्यास अभंग आणि अखंड धैर्याचा ठेवा या महामातेच्या पवित्र चरणापासूनच लाभला.