पान:बाबुर.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इसान दौलत बेगम | शत्रूचा नायनाट झाला आणि बाबुर सुखाने राज्य करू लागला. बाबुर बालपणांत राजा झाला आणि त्या राजेपणांत त्याला जी प्राणघातक संकटे सातत्याने भोगावी लागली, त्या सर्व संकटांस तोंड देण्याचे धैर्य त्याच्या ठिकाणी अवतीर्ण होण्यास मुख्य कारण म्हणजे त्याची आजी. बाबुराने आपल्या सुप्रसिद्ध आत्मवृत्तांत अनेक ठिकाणी तिच्याबद्दल धन्योद्गार काढले आहेत. तिचें नांव इसान दौलत बेगम. ही फार चतुर आणि मोठ्या धीराची बायको होती. तिच्या सांगण्यावरून बाबुराने अनेक साहसाची कामें अंगावर घेतली आणि ती तडीस नेली. ती बाई मोठ्या नेकांची होती. इसान दौलत बेगमच्या आयुष्यात एक मोठा गंभीर प्रसंग होऊन गेला. एकदां बाबुराच्या आजाचा-युनुसखानाचा-शेख जमाल नांवाच्या एका शत्रूने पराभव केला. दुर्दैवाने युनुसखान आणि त्याचे कुटुंब इसान दौलत बेगम या उभयतांस कैद झाली व त्या दोघांस वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले, युनुसखान जिवंत असतांना शत्रूनें इसान दौलतचे लग्न दुस-याशी लावण्याचा घाट घातला. शादी लावण्यासाठीं एक गृहस्थ तिच्या निवासस्थानी दाखल झाला. या बाईने त्यास निमूटपणे आंत घेतलें, दारास कुलूप ठोकले आणि आपल्या दासींच्या करवी त्याचा खून पाडला. ही बातमी जमालला कळताच त्याने याचा जाब विचारला. त्याबरोबर तिने बाणेदारपणाने उत्तर दिलें : जमालने धर्माविरुद्ध वर्तणूक