पान:बाबुर.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर होते ते त्याच्याबरोबर संपले, त्याच्या कोवळ्या बच्च्याने आपला कांहीं अपराध केला नाहीं तेव्हां स्वारीचा बेत रद्द करावा असे त्यांस केव्हाही वाटलें नाहीं. उलट उमरशेख गेला हीच गोष्ट आपल्या फायद्याची झाली; ही सुवर्णसंघि दवडणे मूर्खपणाचे होईल; तो गेला, आतां फर्घाना प्रांतास कोणी शास्ता उरला नाहीं; त्याच्या घरांत पोरवडा झाला; बाबुर अकरा-बारा वर्षांचा कोवळा पोर, एकाद्या कोवळ्या कांकडीप्रमाणे आपण त्यास पिरगळून टाकू आणि मोकळे होऊं या इष्र्येने बाबुराच्या चुलत्यांनी व मामांनीं फर्घाना प्रांतावर चाल केली; पण त्यांत त्यांस यश आलें नाहीं.