पान:बाबुर.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राज्यस्थिति | ही झाली मोगल साम्राज्याची हकीगत; पण बाबुराच्या हाती आलेल्या वंशपरंपरागत राज्याची हकीगत फारच निराळी आहे. बाबुराचा मूळ पुरुष जो तैमूर त्याने जिंकलेल्या राज्याचे अनेक भाग झाले होते आणि त्यांवर मिरासदारीचा वारसा हक्क सांगणारे तैमूरचे वंशज कचाकच एकमेकांचे गळे उतरत होते. तैमूरच्या त्या छोट्या राज्याचे सात तुकडे झाले होते, आणि त्या सात तुकड्यांवर सातजण स्वतः राजे म्हणून वावरत होते. (१) ताशकंद आणि सैरामशाह खरवीया या प्रांतावर बाबुराचा थोरला मामा महंमद खान, ( २ ) ताशकंद आणि यलदूज या दोन ठिकाणांच्या मध्यांतील प्रांतावर बाबुराचा धाकटा मामा अहंमद खान, ( ३ ) समरकंद् आणि बुखारा यांच्यावर बाबुराचा सर्वात मोठा चुलता अहंमद मिझ, (४) बदकशान हिसार आणि कुंदूज यांच्यावर त्याच्याहून धाकटा चुलतामहंमद मिझ, ( ५ ) काबूल आणि गझनी याच्यावर बाबुराचा सर्वांत धाकटा चुडता उलुघ बेग, (६) खुरासान आणि हिरात याच्यावर तैमूरच्या खास वंशांतील पुरुष हुसेन मिझ आणि (७) फघना प्रांतावर बाबुरचा बाप उमरशेख याप्रमाणे राज्य करीत होते. हे सातजण सात राज्यांचे धनी होते. वास्तविकं हे एकमेकांचे काके-मामे, रक्तांनी परस्परांशी निगडीत झालेले. तेव्हां गुण्यागोविंदाने नांदत असतील अशी कल्पना होणे सहाजीक आहे, पण ते तसे नव्हते. भाऊबंदकीच्या पिशाचानें त्यांस इतके पछाडले होते की बोलावयाची सोय नाहीं. भांडणें भांडणे हा त्यांचा नित्याचा व्यवसाय होता. बाबुराचा बाप उमरशेख हा कांहीं या गोष्टीस अपवाद नव्हता; तोही भांडखोर होता. त्याने आपल्या मेहुण्यांना आणि भावना सतावून सोडले होते. तेव्हां त्याचा काटा काढून फर्घाना प्रांत काबीज करण्याचा बेत मुक्रर झाला होता व त्याप्रमाणे हालचालीस सुरुवातहि झाली होती. इतक्यांत उमरशेख मरण पावला. ही बातमी वा-याच्या वेगाने सगळीकडे फैलावली. शत्रु नाहींसा झाला, उमरशेखबरोबर आपलें वैर