पान:बाबुर.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शत्रूचा बीमोड राजा म्हणून बाबुराच्या नांवाच्या ललकाच्या हवेत उठतात न उठतात तोंच शत्रूच्या रणभेरींचे आवाज फर्घाना प्रांताच्या सरसीमेवर ऐकू येऊ लागले. ताशकंदहून बाबुराचा थोरला मामा महंमदखान आणि समरकदहून त्याचा थोरला चुलता अहंमद मिझ मोठ्या तयारीने निघाले. एका बाजूने चुलता आणि दुस-या बाजूने मामा आपल्या दाढी-मिशांना पीळ भरून गुरगुरत येतांना पाहून छोटा बाबुर घाबरला ! त्यांच्या मनगटाला मनगट भिडवण्याची ताकद आपल्याला नाहीं हैं तो जाणून होता. तेव्हां त्याने मवाळीचा मार्ग पतकरला. त्याचा थोरला चुलता अहंमदखान हा जवळ येतांच बाबुराने त्यास निरोप पाठविला कीं, फर्धाना प्रांताचा मी वारसा-हक्कानें राजा आहे, पण मी ते राजेपण सोडून देत आणि तुमचा सुभेदार म्हणून या प्रांतावर राहत; तरी तुम्ही आपली चढाई बंद करा आणि मागे फिरा. बाबुराच्या या निरोपाचा कांहीं एक उपयोग झाला नाहीं. अहंमदखान तसाच चाल करून येऊ लागला; पण बाबुर भाग्यवान् होता, अहंमदखानानें फर्वांना प्रांतांतील उरातिपा, खोजंद आणि मार्घिनान हीं गांवें झपाट्याबरोबर घेतली आणि त्याचा मोर्चा बाबुरावर वळला. या वेळी बाबुर अंदिजान या ठिकाणी होता. आपल्या निरोपास वाटाण्याच्या अक्षता लावून अहंमदखान आपल्या