पान:बाबुर.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राज्यस्थिति बाबुर हा उमरशेखचा युवराज-थोरला मुलगा असल्याकारणाने त्यास फर्घाना प्रांताचे राज्य वारसाहक्कानें प्राप्त झाले. ते राज्य म्हणजे ५०००० चौरस मैलांचा सुपीक प्रदेश. त्याच्या राजधानीचे नांव अंदिजान. या राज्यावर बाबुर आणि त्याचा बाप उमरशेख दोघेही खूष नव्हते. त्यांची दृष्टि समरकंदवर होती. जगद्विख्यात तैमूरच्या सिंहासनावर आपणास राजा म्हणून राज्य करण्यास सांपडावे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती; पण ती सफल न होतां बाबुराच्या पित्यास स्वर्गाची वाट धरावी लागली , पुढे बाबुराने मात्र गादीवर आल्यापासून दोन-तीन वर्षांच्या आंत आपल्या मृत पित्याची इच्छा तडीस नेली. तो समरकंदचा राजा झाला. बाबुराच्या आजाचें नांव अबदुल सय्यद, हा तैमूरलंगाचा नातू. बाबुर हा तैमूर पासून पांचवा आणि चंगीजखानापासून चौदावा पुरुष लागतो. तेव्हां त्याच्या शरिरांत ह्या इतिहासांत गाजेलल्या दोन्ही वंशांचे रक्त सळसळत होते. आईकडून तो मोगल होता आणि बापाकडून तुर्क होता. खुद्द बाबुरास तुकच्याबद्दल आपलेपणा वाटे आणि मोंगल लोकांबद्दल तिरस्कार वाटे. त्याने संस्थापिलेल्या साम्राज्यास तुर्क-साम्राज्य हेच नांव योग्य होते, पण असे न होता त्यास मोगल-साम्राज्य असे नांव पडले. ही घटना अतिशय विचित्र आहे खरी.