पान:बाबुर.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जहिरुद्दिन महंमद ऊर्फ बा बुर बालपण स्वराज्य-संस्थापक श्री छत्रपति शिवाजीमहाराजांच्या पूर्वी बरोवर शंभर वर्षे बाबुराचे चरित्र घडले. इ. स. १६३० मध्ये शिवाजीमहाराजांचा जन्म झाला तर इ. स. १५३० ला बाबुराचा चरित्र-ग्रंथ आटोपला ! त्याचा जन्म ता. १४ फेब्रुवारी इ. स. १४८३ त झाला. त्याचे नांव जहिरुद्दिन महंमद असे ठेवण्यांत आले. मोगल लोकांच्या रासवट जिभेला जहिरुद्दिन महंमद हैं अरबी नांव उच्चारतां येईना म्हणून त्यांनी त्याचे नांव बाबुर ( वाघ ) ठेविलें. तेच नांव इतिहासांत महशूर झालें. बाबुराच्या आईचे नांव कुतलुक निगार व बापाचें नांव उमरशेख, बाबुराचा जन्म होतांच त्या उभयतांस फार आनंद झाला. ही आनंदाची बातमी बाबुराच्या पित्याने आपल्या श्वशुरास कळविली व त्यास या आनंदाच्या प्रसंगी भाग घेण्यासाठी मुद्दाम आमंत्रण दिले. बाबुराच्या माय-आजाचे नांव युनुस्खान असून तो मोगल