पान:बाबुर.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुरवरील अभिप्राय श्री. वि. गं, लेले यांनी आपला हौसेचा विषय म्हणून इतिहासाचा अभ्यास करून जें ग्रंथलेखन केले त्यांत त्यांच्या * बाबुर' चात्रामुळे एक उपयुक्त भर पडली आहे. जे परकीय पुरुष या देशांत येऊन राज्यस्थापना करतात आणि वंशपरंपरा निर्माण करतात त्यांचे जीवन तरी काय आहे याची सविस्तर ओळख या चरित्राने विद्यार्थ्यांना होईल.महत्त्वाकांक्षा, कष्ट,काटकपणा, पराक्रम, दूरदृष्टि, मुत्सद्देगिरी हे गुण असणारे राज्यकर्ते होतात व सुखलोलुप, नाजूक, आळशी, अल्पसंतुष्ट, घरकोंबडे लोक इतरांचे गुलाम होतात हा धडा आजच्या विद्याथ्र्यांनी बाबुरचरित्रापासून घेतला तर भावी पिढी निराळ्या दृष्टीची निघेल. या चारित्रांत बाबुराच्या जीवनाचे अनेक बरेवाईट पैलू आहेत. बालपणापासून राजकारणाची जबाबदारी घेणारा बाबुर; रणांगणांत स्वतः लढणारा योद्धा; स्वतःच्या देखरेखीखालीं तोफा ओतून घेणारा शिपाई; रोज पांचपन्नास कविता करून स्वतःची दैनंदिनी लिहून ठेवणारा साहित्यिक ; सुंदर बागा, इमारती, शिल्पकला, यांची स्थापना करणारा रसिक; मुलावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करून त्याला कठोर शिस्त लावणारा पिता; लढाईत उलट्या काळजाचा आणि त्यानंतर भूतदयेने प्रेरित असा राजा; दूरदृष्टि ठेवून आपल्या वंशाची गादी स्थापन करणारा राज्यसंस्थापक अशा अनेक पैलून युक्त असे हे चरित्र मराठी भाषेतील इतिहास-विषयक पुस्तकांत उपयुक्त भर घालील, डॉ. ग. श्री. खैर. श्री. विनायकरावजी लेले यांसी-सस्नेह नमस्कार वि. वि. तुमचे बाबुरचें हस्तलिखित साद्यंत वाचले. मराठींत बाबुराबद्दल स्वतंत्र चरित्रग्रंथ असा दिसत नाही. एखाद्या पुस्तकाचा भाग म्हणून कांहीं मजकूर बाबुरासंबंधाने आला आहे; पण स्वतंत्र चरित्र -ग्रंथ असा मराठीत नाही. ती उणीव ह्या चरित्राने दूर होईल. भाषा सोपी, मांडणी प्रेरक व आकर्षक झाली आहे. लेखन मुख्यतः मुलांसाठी असले तरी प्रौढांनाहि ते आपण वाचावे असे वाटणारे आहे. प्रस्तुत अधिक काय लिहिणे १ ग्रंथाला सुयश चिंतितों. शंकर नारायण जोशी, १८-१२-४२