पान:बाबुर.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| बाबुर प्रांताचा राजा होता. या वेळी त्याचे वय सत्तर वर्षांचे होते. एवढ्या उतारवयांत नातवंडाची प्राप्ति म्हणजे मोठी अपूर्व गोष्ट झाली असे त्यास वाटलें, आणि म्हातारा मोठ्या आनंदाने या उत्सवप्रसंगी दाखल झाला. जिकडे तिकडे मौज चालली होती. युनुसखानाच्या नातवंडाचे ( बाबुराचे ) जावळ करण्यांत आले. हा समारंभ मोठ्या थाटाचा झाला. बाबुराच्या बाललीला माता-पितरांना आनंद देत होत्या, बाबुर दिवसानुदिवस मोठा होत होता. तो पांच वर्षांचा झाला तेव्हां त्यास समरकंद येथे नेण्यांत आले. समरकंदचा सुलतान अहंमद याच्या छोट्या लेकीशी (आइशा) त्याचा साखरपुडा झाला. समरकंद पाहण्यासाठी आलेल्या या बाल-पाहुण्याने चांगलाच लाट मारला. समरकंदच्या सुलतान अहमदचा तो जावई झाला. हा सुप्रसंग आनंदाने पार पडला. या छोटेखानी नियोजित नवरा-नवरीचे अनेक गमतीचे सोहाळे झाले. यापुढील त्याची चार-पांच वर्षे शिक्षणांत गेली. बाबुरास आतां अकरावें वर्ष लागले. या वर्षी त्याचा पिता उमरशेख अक्षीच्या किल्लयांत अपघाती मरणानें मेला, त्या काळच्या राजे लोकांना कबूतरे खेळविण्याचा नाद होता. उमरशेखचा कबूतरखाना अक्षी किल्लयाच्या नदीकडील बाजूच्या तटावर होता. उमरशेख कबूतरे पाहण्यासाठी तेथे गेला असतां तो तट कोसळला. तटाबरोबर उमरशेख फेकला गेला व जागच्या जागी ठार झाला (ता. ९ जून इ. स. १४९४). उमरशेखनंतर बाबुर फर्घाना प्रान्ताचा राजा झाला. अकरा वर्षांच्या या कोवळ्या पोराच्या मस्तकावर छत्रचामरें झळकू लागली आणि मोर्चलें वारली गेली. जगताच्या दृष्टीने बाबुर राजा झाला, छत्रपति झाला; पण ती छत्रचामरें सुखाची नसतात. त्यांच्यामागें दबा धरून बसलेल्या असंख्य कट्यारी दिवसाढवळ्या टळटळीत बारा वाजतां भर चौकांत कंठस्नान घालण्यास कमी करीत नाहींत. तारामंडळाप्रमाणे चकचकणा-या राजमुगुटास फड्या निवडुगाचे अणकुचीदार काटे असतात आणि ते मस्तकाच्या नाजूक नाजूक