पान:बाबुर.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वाध्याय १५३ ३५. पानिपत : बाबुरला हिंदुस्थानबद्दल आपलेपणा कां वाटत होता हैबाबुरने इब्राहिमखानाकडे काय निरोप पाठविला १ इब्राहिमखानाने त्या खलित्यासंबंधी कोणते धोरण स्वीकारले ? त्याने काय करावयास पाहिजे होते ? इब्राहिमखानाच्या अफाट सेनेचा बाबुराने धुव्वा कसा उडवला ? इब्राहिमखानाचा पराभव कशामुळे झाला ? दुस-या महायुद्धाचा शेवट अॅटमबाबनें व पहिल्या महायुद्धाचा शेवट टॅकने केला. ३६. कालंदर : पानपत येथे इब्राहिमखानाचा पराभव होण्याची कारणे कोणती ? शिवाजीचे सैन्य कमी असतां मोगल त्याचा युद्धांत पराभव को करू शकले नाहीत ? संताजी-धनाजीनें मुसलमानांस कसे त्राहि भगवान करून, सोडले ? ' तुल्यमा' या युद्धपद्धतीची माहिती द्या. खुदवा ' म्हणजे काय ? या युद्धांत मिळालेल्या लुटीतून त्याने कोणास काय काय दिले ? यांत त्याच्या अंगचा कोणता गुण दिसून येतो ? बाबुराने इब्राहिमखानाच्या आईची व्यवस्था काय केली ? कां ? हे सर्व करीत असतां त्याने स्वतःकारिता काय ठेविले ? कां ? त्याला कालंदर हैं नांव कां मिळाले ? ३७. अनाहूत संकट : बाबुरच्या सैन्यांत 'मायदेशी परत चला ! अशी लाट उसळल्याचे कारण काय ? बाबुराने त्या प्रसंगाला कोणच्या प्रकारे तोंड दिले ? महंमद गझनी, तैमूरलंग व बाबुर यांच्या स्वायांत कोणता फरक होता ? त्यांच्याशी सहकार्य न करणारी प्रजा बाबुरच्या बाजूला कां वळली ? ३८. राणा संग : राणा संग हा कोण ? कोठला ? त्याचा मोठेपणा थोडक्यांत द्या. बाबुर जर हिंदुस्थानांत आला नसता तर राणा संगाने काय केले असते ? कशावरून ? राणा संग व बाबुर यांचे बिनसायचे खरे कारण कोणते ? त्यांचें जर मैत्रीचे संबंध होते तर 'राणाने शब्द पाळला नाहीं' असे बाबुर कां म्हणाला ? राणाची बाबुरविरुद्ध काय तक्रार होती ? ३९. कानवाची लढाई : ही लढाईकोणाकोणांत झाली ? राणा संगाच्या बाजूला कोणकोण होते ? ते कशाकरितां लढत होते ? त्यांची कल्पना काय होती ? महंमदखान लोदी राणास कां येऊन मिळाला ? बाबुराला