पान:बाबुर.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर २२. सुटका : बाबुराचे मनाला कोणती जखम झाली होती ? तंबलच्या भावाने बाबुरची मदत कां मागितली ? त्यांत त्याचे राजकारण कोणचे होते ? मामानेसुद्धां तंबलला मदत करावी असे बाबुरला कां सुचविलें ?

  • सुखकारक परिस्थितीच्या हिरवळींतून प्राणघातक प्रसंगाचा नागः सळसळत होता. हिरवळीची परिस्थिति कोणती ? नाग, कोणाला म्हटले ? कां ? * दुधाने तोंड पोळले की ताक फुकून प्यावे.—कल्पनाविस्तार करा.

२३. काबूल : बाबुरची दृष्टि समरकंदहून काबुलकडे कां वळली ? लेखकानें हरळीची मुळी ' कशाला म्हटले आहे ? लुटालूट करणाच्या सरदाराला बाबुर कोणची शिक्षा देत असे ? कां ? काबूलवर स्वारी करण्याकरितां त्याला कोणी मदत केली ? काबूल जिंकण्यांत बाबुरला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत, असे कां ? मुकीमबेग याचा प्रश्न बावुरने कसा मिटवला ? कां ? २४. स्थिरस्थावर व व्यवस्था : बाबुरला काबूलचे राज्य मिळाल्यावर त्याने केाणत्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या ? त्या गोष्टी करण्यांत बाबुरची दृष्टि कोणती होती १ तेथील लोकांशी वागण्याचे बाबुराचे धोरण कोणते हे ते १ ते तने कां होते ? फार पूर्वीच्या-एका म्हातारीनें मनांत पेरलेल्याकल्पनेस साकार स्वरूप देण्याकरितां त्याने कोठे कठे प्रवास केला १ बकीबेगची मिजास उतरविण्यासाठी बाबुराने काय केलें ? ते करणे योग्य होते का ? तसे जर त्याने केले नसते तर काय झाले असते ? बकीवेगला क्षमा न करण्यांत बाबुराचा हेतु कोणता ? ३ मध्यवर्ती सत्ता कमकुवत झाली असता इतर सरदार शिरजोर बनतात वे राज्यकारमात सुसूत्रपणा रहात नाही. एवढेच नव्हे तर ते सरदार मध्यवर्ती सत्तेपासून फुटून निघून स्वतःचे घर थाटतात.-अशी इतिहासांतील उदाहरणे सांगा. ( दक्षिणेतील निजाम, मल्हाराव होळकर आणि..? )