पान:बाबुर.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वाध्याय १४९ १७. ज्योतिषाने घात केला : शैवानीखानावरील : स्वारीच्या वेळी ज्योतिषाने काय सल्ला दिला ? त्याचा परिणाम काय झाला ? अशा वेळी ज्योतिषावर सेनानींनी विश्वास ठेवावा का ? कशाकरितां १ ( संभाजी व कलुषा यांसंबंधी माहिती मिळवा ) त्याच्या सेनेतील किती सैनिक जिवंत आले ? १८. समरकंदला रामराम : समरकंदचे संरक्षण करणे कठीण असे ‘बाबुरास कां वाटत होते ? त्या वेळी समरकंदमधील लोकांची स्थिति कशी होती ? बाबुर समरकंदबाहेर पडला त्या वेळी त्याच्याबरोबर कोण कोण स्त्रिया होत्या ? त्याची बहीण त्याच्याबरोबर कां आली नाही ? एकजुटीने प्रवल शत्रूशीं मुकाबला केला तर तो नामोहरम होईल हें माहीत असतांनासुद्धां अपसांतील वैरामुळे एकजूट होऊ शकत नाहीं व तो प्रबल शत्रु'एकएकट्याचा पराभव करतो.-मराठ्यांच्या इतिहासांतील अशी कांही उदाहरणे शोधा. । * जात्यांतील रडतात, पण सुपांतले हंसतात.–विस्तार करा. १९. वनवास : उरतिपा येथे असतांना त्याने आपल्या जीवनांत सुख कसे उत्पन्न केलें ? तो कोणाकडे रहात होता ? त्याला तैमूरलंगाच्या स्वारीची हकीगत कोणी सांगितली ? त्याच्या मनांत कोणत्या विरोधी विचारांचे काहूर माजले ? त्याने आपल्या भाऊबंदास मान खाली घालून नजराणे कां पाठवले ? तंबलचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने कोणाचें साहाय्य घेतलें ? २०. जखमी वाघ : कोणाच्या साहाय्याने बाबुर समरकंदवर चालून गेला ? त्याने तंबलची शक्ति कमी करण्याकरितां काय केले ? बाबुरच्या मांडीला जखम कोणी व केव्हां केली ? | २१. कुचंबणा : बाबुर ने जिंकलेले प्रांत अहंमदखानाचे ताब्यात देण्यांत महंमदखानाचे हेतु काय होते ? आपली कृति बाबुरच्या फायद्याकरितांच आहे हे त्याने बाबुरला कसे पटवून दिले ? बाबुरने त्याच्या म्हणण्याला मान्यता कां दिली ?

  • सुसरीबाई, तुझी पाठ मऊ.'- कल्पनेचा विस्तार करा.