पान:बाबुर.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर wwwwwwwwwwwwwwwwww चुकीचे होते का ? कां ? त्यानंतर बाबुर कोठे गेला ? त्याच्या धुमसणाच्या मनाला कशाने समाधान मिळाले ? * पोटांत वडवानलाच्या ज्वाला एक सारख्या भडकत असतांना खदखदा हसावें –यांतील सौंदर्य शोधा. * कोणच्याही नात्यापेक्षां रक्ताचे नाते जास्त श्रेष्ठ.'–विस्तार करा. ११. आमंत्रण : दोस्त अलीचे पत्र वाचून बाबुरचा त्यावर विश्वास कां बसला ? यांत त्याच्या अंगचा कोणता गुण दिसतो ? त्याच्या गोंधळलेल्या मनानें कोणता निर्णय घेतला ? १२. नामधारी राजा : फर्घाना प्रांताचे राज्य बाबुरला परत केव्हां ‘मिळाले ? राज्यकारभार करण्यासबंधी बाबुरच्या कल्पना काय होत्या ? बाबुर व अहंमद तंबल यांमध्ये बेबनाव कां झाला ? त्याचा परिणाम काय झाला ? बाबुरला अंदिजान घेऊन समाधान कां मानावे लागले १ * आपसांतील भांडणामुळे नेहमी ताटाच होतो-हे दाखविणारी मराठ्यांच्या अगर मोगलांच्या इतिहासांतील उदाहरणे सांगा. १३. अदिजानला रामराम : अंदिजान बाबुरनें कां सोडलें ? १४. फसगत : समरकंदच्या लोकांना बाबुरच राजा हवा असें कां वाटू लागले ? बाबुर किश येथे असतां त्याला आश्चर्यचकित करून टाकणारा कोणता प्रसंग घडला ? । १५. पुन्हा एकदां समरकंद : त्यानंतर बाबुर कोठे येऊन राहिला ? शैवानाखान गादीवर असतांना आपल्याला समरकंदची गादी मिळवतां येईल असे बाबुरला कां वाटत होते ? इ. स. १५०० मध्ये बाबुराने समरकंदमध्ये कसा प्रवेश मिळविला ? त्याच्या येण्याचा तेथील लोकांवर काय परिणाम झाला ? लोकांना बाबुर हवाहवासा कां वाटत होता ? १६. पुढील तयारी : बाबुराने समरकंदची गादी मिळविली त्या वेळी त्याचे वय काय होते ? शिवाजी व ज्ञानेश्वर यांनी इतक्या लहान वयांत कोणची कामगिरी केली त्याची माहिती मिळवा, उझबेग लोकांचा बंदोबस्त करण्याकरितां बाबुराने काय काय केलें ?