पान:बाबुर.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वाध्याय १४७ -~सामथ्ये असते; पण या छळाला सुद्धां सीमा असते. ती मर्यादा ओलांडल्यावरच लोक क्रांति करतात. फ्रेंच राज्यक्रांति वगैरेबद्दल शिक्षकांकडून माहिती मिळवा. संभाजीच्या कारकीर्दीत मराठी राज्याची स्थिति कशी होती ते सांगा. ७. समरकंदवर चाल : बाबुर समरकंदवर चालून केव्हां गेला ? त्याला मदत करण्याचे कोणीं कबूल केले होते ? त्याप्रमाणे त्याने मदत का केली नाही ? बाबुरच्या सैन्याने समरकंद लुटले असता त्याने आपल्या सैनिकांना कोणता आदेश दिला ? त्याचा समरकंदमधील लोकांवर काय परिणाम झाला ? बाबुरला जरी रमरकंद घ्यावयाचे होते तरी तेथील प्रजेची छळवणूक नको होती, आणि त्यामुळे सात्विक मनाच्या बाबुराला वाईट वाटले. यांत त्याच्या मनांत वसत असलेली देशहिताची बुद्धि स्पष्ट दिसत आहे. चंगीझखान, तैमूरलंग, नादिरशहा यांच्या स्वान्यांची माहिती मिळवा. उल्लाउद्दीन खिलजीच्या दक्षिणेतील स्वारीची माहिती मिळवा. बाबुरने बैसंगर व शैबानिखान यांना कसे पिटाळलें ? । तैमूरलंगाच्या सिंहासनावर बसल्यानंतर त्याच्या मनांत आलेले विचार त्याच्याच शब्दांत द्या. ८. शंभर दिवसांचे राज्य : समरकंद जिंकून घेण्यांत बाबुरच्या सैनिकांचा काय हेतु होता ? त्याच्या सैन्यांत बेदिली माजण्याची कारणे कोणती ? सैन्यास समरकंद लुटण्यास बाबुरने अनुमति कां दिली नाही ? बाबुरचें फर्वाना प्रांताचे राज्य कसे गेले ? समरकंदचे राज्य कोणी बळकावलें ? केव्हां बळकावले ? ९. अर्धे राज्य : फर्घाना परत मिळविण्यासाठी त्याने काय प्रयत्न केला ? तो कां फसला ? त्याच्या सेनेतील अनेक लोक त्याला सोडून कां गेले ? * अश्रूच्या रूपाने निराशा निचरून तो ताजातवाना झाला '-यांतील सौंदर्य शोधा. १०. रंकाचे जिणे : समरकंद व खोजंद यांमधील पर्वतमय प्रदेशांत सुलतान अलीने बाबुरास कां राहू दिले नाही ? सुलतान अलीचे हे कृत्य