पान:बाबुर.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुराचे चारित्र्य १४१ त्याच्याजवळ होता. तो म्हणजे चढाई करून येणा-या सेनेचे व सेनानायकाचे सामर्थ्य आणि मर्मस्थाने त्यास पूर्णपणे अवगत असत. त्याच्या अतुल धैर्याला चिकाटीची जोड होती. त्याची महत्त्वाकांक्षा तर दुर्दमनीय होती. त्याची इच्छाशक्ति अतिशय प्रखर होती. नेता म्हणून नांव गाजविण्याची त्याची महत्त्वाकांक्षा फार दांडगी होती. एक-दोन पराभवाच्या तडाक्याने त्याने केव्हांच मरगळ खाल्ली नाही. त्याचे उद्योग सतत चालूच असत. पराजित शत्रूवर अत्याचार होऊ नयेत म्हणून तो फार दक्ष असे. इब्राहिमखान लोदीच्या कुटुंबियांवर अत्याचार झालेच असते, पण बाबुर त्या ठिकाणी तात्काळ हजर झाला म्हणून तो प्रसंग टळला. त्याने इब्राहिमखान लोदीच्या कुटुंबियांची त्यांच्या इतमामाप्रमाणे नीट व्यवस्था लावून दिली. दौलतखानाचा मुलगा गाजीखान हा मोठा विद्वान् आणि प्रतिभासंपन्न कवि होता. त्याचे फार मोठे ग्रंथालय त्याने या क्रान्तीच्या तडाक्यांतून वांचविलें. विजयामुळे बेहोष होऊन सैनिकांनी बहराह गांवाच्या नागरिकांवर अत्याचार चालविल्याची व त्यांना ते वाईट तव्हेची वागणूक देत असल्याची वार्ता बाबुराच्या कानावर येताच त्याने ताडकन् कांहीं सैनिक पाठवून ते अत्याचार ताबडतोब थांबविले. ज्या सैनिकांनी ही कृत्ये केली त्यांस पकड. ण्यांत आले. ज्यांनी फारच अत्याचार केले होते. त्यांना ठार करण्यांत आले आणि बाकीच्यांची नाके उभी कापून त्यांची धिंड लष्कराच्या तळावर काढण्यात आली. तैमूरच्या प्रांतास तो आपले प्रांत समजे. तेथे त्याने कोणत्याही प्रकारची लुटालूट केली नाहीं व अत्याचार होऊ दिले नाहीत. व्यक्तिमत्व एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे बाबुराचा मोठेपणा एकदम डोळ्यांत भरण्यासारखा आहे. इंद्रप्रस्थाचे तख्त काबीज केल्याने त्याच्या कीर्तीच्या नौबदा दशदिशां झडल्या. इतिहासांत त्याचे नांव उच्चपदी झळकू लागले. त्याच्या चेचाळीस कुळांचा उद्धार झाला. याहीपेक्षा त्याचे नांव जगतांत अजरामर