पान:बाबुर.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० बाबुर

२. आळसाचा आणि सुखाचा त्याने झडझडून त्याग करावा, कारण सुखलोलुपता आणि आळस राजास शोभत नाहींत. ३. बेग लोकांशी म्हणजेच आपल्या लोकांश व मंत्र्यांशी विचार विनिमय करावा, दिवसांतून दरबार दोन वेळा बोलवावा. ४. सैन्यांत कडक शिस्त ठेवावी. लष्कर बलशाली असावे. हिंदुस्थानचा बादशहा म्हणून हुमायूनने आपल्या वागणुकीचा ढंग कसा ठेवावा यासंबंधींची बाबुराची सांगी विशेष आहे. |. १. अनेक धर्माच्या लोकांवर राज्य करण्याचे भाग्य ईशकृपेने तुला लाभले आहे, तेव्हां प्रजेला न्यायदान करतांना धार्मिक भावनेस बळी न पडतां न्यायनिवाडा नि:पक्षपातीपणाने कर. २. गोहत्या करण्याचे टाळ, त्यामुळे हिंदु लोक तुझ्यावर प्रेम करतील, त्यांच्या अंतःकरणाची पक्कड घेतली जाईल. प्रजा कृतज्ञतेच्या • रज्जूनें बद्ध करण्याचा प्रयत्न कर, ३. कोणत्याही धर्माच्या लोकांची पूजास्थाने नष्ट करू नकोस. ४. इस्लामी धर्माचा प्रसार उपकाराच्या समशेरीने कर. । ५. शिया आणि सुनी यांच्या मतभेदाकडे दुर्लक्ष कर; नाहीतर इस्लामचे सामथ्र्य खचून जाईल. सर सेनापति बाबुर। सेनापति म्हणून बाबुराची योग्यता फार मोठी होती. दमदार घोड्याची मांड, अचूक नेमबाज, अव्वल दर्जाचा समशेरबहादूर, जिद्दीचा शिकारी, सैनिकांच्या आकांक्षा बरोबर हेरणारा असा अष्टपैलू सेनानी तो होता. जन्मजात पुढारी पण तो होता. महान् नेत्यास लागणाच्या सर्व सद्गुणांचा संगम त्याच्या ठिकाणी झाला होता. सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून त्याने अनेक आपत्तींना तोंड दिले होते. तसेच चांगले दिवसही काढले होते म्हणून त्याला प्रत्येक सैनिकाची व सेनानायकाची खतखोड पूर्णपणे माहीत होती. त्या सर्वांपेक्षां सेनानायकास लागणारा फार मोठा अपूर्व गुण