पान:बाबुर.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४३ बाबुर करणारी त्याची दुसरी द्वितीय कृति म्हणजे त्याचे आत्मचरित्र. आत्मचरित्रांच्या दृष्टीने आत्मचरित्रांत त्याचे स्थान केवळ अद्वितीय आहे. ते एक बिनमोल साहित्य आहे. त्यांत साहित्याचे सर्व गुण प्रकर्षाने आहेत. त्या ग्रंथांत प्रारंभाला त्याने आपलें बालपण मोठ्या रसिकपणाने सांगितले आहे. नंतर दैनंदिन घडणा-या व्यवहारांच्या रोजनिशी-वजा नोंदी आहेत. विशेष गोष्टींचे तपशील आहेत. कांहीं टिपणी आहेत. या आत्मवृत्ताचा विशेष असा कांहीं न्यारा आहे की, हा राजराजेश्वर त्याच्यावर येऊन गेलेल्या प्रसंगांची चित्रे, कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता खुल्या अंत:करणाने मोठ्या बहारीने रंगवतो. त्याच्या त्या तन्मयतेत तो आपला मोठेपणा, राजराजेश्वराचे डामडौल व दरबार पार विसरून जातो आणि मोकळ्या अंत:तकरणाच्या सहृदय लेखकाप्रमाणे त्याचे लिखाण रंगत असते. त्याने रेखाटलेली व्यक्तिचित्रे हुबेहुब आणि बोलकी आहेत. आपल्या ईप्सितासाठी अहर्निश झटणारा वाटेल तसलें से कट अंगावर घेऊन त्यांतून यशस्वीपणे पार पडण्याची पल्लेदार दृष्टि असणारा, हाती असणान्या चतुर्विध साधनांची योग्य प्रकारे गुंफण करून त्या आयुधांचा झोत योग्य ठिकाणी चालू करण्याची अपूर्व कार्य-कुशलता अंगी असणारा, कामाचा उरक, पराकाष्ठेचा आत्मविश्वास, जबाबदारी अंगावर घेण्याची उत्सुकता, क्षणोक्षणीं बदलणाया परीस्थतीस तोंड देण्याची धमक, पल्लेदार कल्पकता व अपूर्व लेखनशैली वगैरे सद्गुणांचा मुक्तहार या दिल्लीश्वराच्या गेळ्यांत रुळत होता. समाप्त