पान:बाबुर.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुराचे चारित्र्य १३९ महान् दुर्घट होते. त्यांना आपल्या हुकमतींत वागविणे हे तर त्याहूनही कठीण होते. ते लोक बाबुराच्या नांवानें खुदबा पढत पण वसूल मात्र कांहींच मिळत नसे. धाकधपटशा दाखवून जे कांहीं मिळे त्यावरच समाधान मानावें लागे. या सर्वाचा भरपूर वचपा हिंदुस्थानांत निघाला होता. सिंधूचा पूर्व, भाग सर्व पंजाब, मुलतान, सतलज नदीची पूर्व आणि दक्षिण बाजू, हिंदुस्थानचा सुपीक प्रदेश, राजपुतांचे सर्व प्रदेश, तसेच माळवा, बयाना, राथभोर, ग्वालेर व चंदेरी ह्या किल्लयांवर बाबुराची सत्ता प्रस्थापित झाली होती. ठिकठिकाणच्या राज्यकारभारांत एकसूत्रीपणा होताच असे नाही. प्रत्येक राजा, प्रत्येक जिल्हा व प्रत्येक गांव या ठिकाणचा रोजचा व्यवहार अगदी सामान्य पद्धतीने चाले. दिवाणी आणि फौजदारी अधिकार मोठमोठाल्या अधिका-यांना असत. । त्यावेळी कोणकोणते कर होते, हे समजण्यास नीट साधन नाही. पण शेतसारा हा मुख्य कर होता व तो जमीनदारांपासून घेतला जाई. बाहेरून येणा-या वस्तूंवर कर असे या ठिकाणांपासून त्या ठिकाणावर जाणाच्या मालावरही कर घेतला जाई. दुकानदारांवर कर असे. ज्याठिकाणी मुसलमानांची सत्ता अबाधित होती तेथील हिंदु लोकांवर जिजिया कर होता. बाबुर हिंदूंना जंगली म्हणे. त्यांच्या मुंडक्यांचे मनोरे धर्मनिष्ठ मुसलमानांना खुष करण्यासाठी तो उभारी. राणा संगाच्या लढाईच्या वेळी त्याने जिहाद उद्घोषित केला. गाजी हें नामाभिधान आपल्या बिरुदावलीत दाखल केले हे जरी खरे तरी तो कांहीं कडवा मुसलमान नव्हता. तो व्यवहारी होता, त्याच्या धर्मभावना लवचीक होत्या. त्याचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता. हुमायून त्याचा ज्येष्ठ पुत्र होता. तो युवराज होता. त्याच्यावर त्याचे प्रेम विशेष होते. तो त्याला नेहमीच उपदेश करी. त्याने त्याला खालीलप्रमाणे उपदेश केला आहे : माझ्या मुला :१. राजाने संकटांत आणि धोक्यांत जीव घालून आपल्या पराक्रमास उजळा द्यावा.