पान:बाबुर.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ बाबुर दरम्यान डाक घरे बांधण्यांत आली. टपाल त्वरित पोंचावण्यासाठी सह। ‘सहा घोड्यांचे एक पथक व त्यावर अधिकारी नेमण्यांत आले. बाबुर स्वारीकरिता किंवा शिकारीसाठी ज्या ज्या मार्गाने प्रवास करी तो तो रस्ता मोजण्याचे काम त्या त्या वेळी लगेच करण्यांत येई. बावुराने निर्माण केलेले माप बाबुरी गज या नांवाने प्रसिद्ध होते. हा गज जहांगिराच्या कारकीर्दापर्यंत चालू होता. बाबुर सौंदर्याचा मोठा भोक्ता. त्याच्यासारखा रसीक तोच. कलाकुसरीने परिप्लुत अशी सौंदर्यपूर्ण उद्याने व भव्य इमारती बांधण्यांत त्यास नितान्त आनंद वाटे, उद्याने, इमारती, पाण्याचे नळ व खजिने बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणांत चालू होते. एकट्या आग्रा शहरांत बाबुराच्या राजवाड्यावर ६८० लोक या कामावर असत. याशिवाय आग्रा, शिक्री, बयाना, धोलपूर, ग्वालेर व कौल या ठिकाणी मिळून १४९१ घडशी काम करीत. बाबुराच्या राज्याच्या दुस-याच वर्षी यमुनेच्या रम्य तटाक एक भव्य व सौंदर्यपूर्ण उद्यान निर्माण करण्यात आले. हे ठिकाण बाबुराचे फार आवडते होते. तेथे बादशहा आपल्या खास मर्जीतील मोंगल सरदारांसमवेत आपला काल मोठ्या आनंदाने व ख्यालीखुशालींत घालवी. त्या ठिकाणी नाचरंग व गाणबजावणी चालत. पुढे या बागेच्या धर्तीवर कामरानने एक बाग लाहोरास निर्माण केली. बाबुराच्या सुदैवानें तो अशा देशाचा धनी झाला होता की त्याचे वर्णन त्याच्या कल्पनेत बसणारे नव्हते. त्या देशाचा विस्तार महान् विशाल होता. तेथील संपदा अमाप होती. बाबुर हिंदुस्थानचे वर्णन करतो की, “ या देशाचा विस्तार अफाट असून तो सोन्या-चांदीने खच्चून भरला आहे. ' बाबुराच्या राज्याचा वसूल ६३३१८० ० ० ० रुपये होता. हिंदुस्थानाबाहेर बाबुराचे राज्य रानटी लोकांवर होते. हे लोक डोंगरांवरून वस्त्या करून राहात. त्यांच्यावर सत्ता प्रस्थापित करण्याचे काम