पान:बाबुर.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० बाबुर www उदक हुमायूनसाठी सोडले. त्या क्षणी हुमायूनच्या प्रकृतीस आराम पडू लागला आणि बाबुराची प्रकृति क्षीण होऊ लागली. पुत्रासाठी पित्याने आत्मार्पण केले. तिकडे हुमायून खडखडीत बरा झाला आणि इकडे बाबुर याही बाबतीत उच्चांक गांठून स्वगंत पैगंबराच्या चरणी दाखल झाला. - मरणापूर्वी पांचच मिनिटे आधीं बाबुराने अत्यन्त सावधानतेने एक महत्वपूर्ण गोष्ट केली. त्याने आपल्या हाताने हुमायूनला चार खाशा सरदारांच्या समक्ष स्वतःच्या तख्तावर मोठ्या आनंदाने बसावले. आपल्यानंतर सर्वसत्ताधारी तक्तनशीन बादशहा म्हणून त्याने त्याचे नांव उद्घोषित केले, त्यानंतर तो तख्ताच्या पायाशी एका कोचावर पडून राहिला. या वेळी त्याच्या चेह-यावर मोठे समाधान विलसत होते. आपण कृतकृत्य झालों असे त्यास वाटत होते. इतक्यांत त्याचा शेवटचा क्षण आला. त्याबरान र प्राण सोडतांना मोठ्या कळकळीने त्याने हुमायूनला सांगितले की बाजारे, आपल्या बंधूना अन्तर देऊ नकोस. त्यांचे सर्व अपराध पोटांत घाल. कोणत्याही कारणास्तव त्यांच्यावर शस्त्र धरूं नकोस. लाडक्या,मी येतो. असे ग्हणून त्याने आपले प्राण सोडले. | बाबुरास एकंदर चार मुलगे होते. हुमायून, कामरान, अस्करी आणि हिंदाल यांची नांवें इतिहासांत दाखल झाली व अनवार नांवाचा एक धाकटा मुलगा बाबुरासमक्षच निवर्तला. त्याला सहा मुली होत्या. पहिली अशिआ सुलतान बेगम. ती लहानपणीच वारली. दुसरी मासुमा सुलतान बेगम. ती लग्नानंतर थोड्याच दिवसांनी निवर्तली. तिसरी गुलबदन बेगम. चौथी गुल रंग बेगम. हिच्या मुलीने-सलीमा सुलतान बेगमने-बाहिरामखानाशी लग्न केले व त्याच्यानंतर सम्राट् अकबराशी लग्न केले. पांचवी गुलचहार बेगम आणि सहावी शेहर बन बेगम,