पान:बाबुर.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हुमायूनसाठी बलिदान १३१ बाबुरास तीन बायका होत्या. ( १ ) मासुमा, ( २ ) गुलरूक, ( ३ ) दिलबर. प्रत्येकाचे आयुष्य ही सुद्धा एक लढाई आहे आणि तिचा शेवट यशस्वी होणें ही परम भाग्याची गोष्ट आहे. बाबुराच्या आयुष्याचा कळसाध्यायही पण तसाच गोड झाला. ता. २६-१२-१५३० ला बाबुराचा आत्मा या पार्थिव देहाच्या पिंज-यांतून मुक्त झाला. केवळ अठेचाळीस वर्षांचा हा थोर पुरुष आणि छत्तीस वर्षे आपल्या राज्यासाठी आहोरात्र झुंज घेणारा हा राजराजेश्वर पार्थिव देहास सलाम ठोकून दुनियेपार झाला. पण त्याचा कीर्तिपरिमल मात्र एकसारखा दरवळत राहील यांत शंकाच नाहीं. बाबुराचा अंत्यविधि त्याच्या इच्छेनुरूप काबूलनजीक एका टेकडीच्या पायथ्याशी झुळझुळ वाहणा-या एका ओढ्याजवळ सृष्टिसौंदर्याने संपन्न अशा स्थळी करण्यात आला. शहाजहान बादशहाने इ. स. १६४० त त्या जागेवर टुमदार कवर बांधिली. अद्यापहि त्या ठिकाणी काबूलचे लोक हवा खाण्यास व नवस करण्यास जमा होतात,