पान:बाबुर.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हुमायूनसाठीं बलिदान १२९ आगमनार्थ देण्याचे ठरविले. त्या दिवशी खान्याचे वेळी त्यास मुख्य पाहुण्याचा मान देण्यात आला होता. प्रस्तुतचे दिवस या पितापुत्रांनी मोठ्या मनमोकळेपणाने आणि आनंदानें काढिले. कुटुंबाचा कर्ता पुरुष आणि साम्राज्याचा भावी सम्राट् या नात्याने त्याची कर्तव्ये कोणती या गोष्टींची मोकळी चर्चा झाली. उभयतांचे दिवस आनंदांत चालले होते. पण कसोटीची वेळ आली आणि कसोटी म्हटले की, बाबुर बावनकशी उतरावयाचा हेही पण ठरलेलेच. आतां पिता या नात्याने बाबुरास शेवटचा निकष लागणार होता, आणि येथे हे सोनें बावनकशी ठरले. प्रात:काळी झळाळणाच्या सोनेरी किरणाप्रमाणे त्याची कीर्तिकिरणे जगाच्या अंतापर्यंत या प्रसंगाने दीप्तिमान राहतील यांत तिलप्राय शंका नाहीं. हुमायून एकाएकी आजारी पडला. दिवसानुदिवस त्याचे दुखणे विकोपास जाऊ लागले. वैद्य, राजवैद्य आणि धन्वंतरींनी हात टेकले. प्रकृति आवाक्यांत येईना, क्षणाक्षणाला चिंता वाढू लागली. सर्वांची तोंडे चिमणीसारखी झाली. दुःखाचे वातावरण तीव्र स्वरूप धारण करू लागले. औषधे संपून दैवी उपायांची चर्चा सुरू झाली. बाबुर उमदा होता साम्राज्ये मिळविणे आणि घालविणे हा त्याच्या आयुष्याचा खेळ होता. सोने, रूपे, जडजवाहीर, माणिक, मोती, भूदान काय वाटेल ते, साम्राज्यसुद्धा. पण या सर्व गोष्टींची दाने ठोकरीने उडविणाच्या काळपुरुषास असल्या फडतूस चिजांची जरूर नव्हती. त्याला बाबुराच्या अंतःकरणाचा तुकडा हवा होता. त्याची ही मागणी कोणास उमगण्यासारखी नव्हती. पण ती मनःसामर्थ्याने जाणणारा एकीएक बाबुरच झाला. | एक दिवस हुमायूनच्या रुग्ण-शय्येभोंवतीं बाबुराने अत्यंत पवित्र मनाने आणि पाक दिलानें तीन प्रदक्षिणा घातल्या आणि मनांतल्या मनांत त्याने पैगंबराची करुणा भाकली. त्याबरोबर त्याच्या मनःचक्षु पुढे एक दीप मालवला आणि दुसरा लागला. त्याबरोबर त्याने आपल्या ऊर्वरित आयुष्याचे