पान:बाबुर.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ बाबुर उपदेश केला आहे. त्या वेळीं समरकंद पुन्हा ताब्यांत येण्याचा रंग दिसत होता म्हणून हुमायूनने समरकंदवर चाल करून जावे म्हणून लिहिले होते. साहस करून दाखविण्याची हीच वेळ आहे, तेव्हां स्वारी अंगावर घेऊन जातीनिशी चाल करून जावें; आळस न करणे, कारण सुस्ती आणि सुख राजेपणास शोभत नाहीत; राजा म्हणविणाराने सौख्यास आणि सुस्तीस थारा देता कामा नये. या पत्रांत स्वारी-शिकारीसंबंधींचाच मजकूर होता असे नव्हे तर त्याने कसे वागावे याची छाननी होती. त्याने आपल्या भावाशी चांगल्या प्रकारे वागावे, बदकशानच्या एकलकोंड्या जीवनाविषयी कुरकुरू नये, वेग सरदारांश संगनमत करून त्यांचा अभिप्राय वारंवार व्यावा, राजकारणांतील खास खाश्या लोकांच्या गांठी दिवसांतून दोनदां तरी घ्याव्यात, लष्कराची ताकद आणि शिस्त उत्तम असावी, वगैरे मुद्यांची व प्रमुख गोष्टींची नोंद त्या पत्रांत आहेच पण बारक्या-सारक्या गोष्टी सुद्धा त्याच्या दृष्टांतून सुटल्या नाहींत. तुमची पत्रे तुम्ही पुन्हा वाचतां कीं नाहीं कोण जाणे ? पण तुम्ही तसे कराल तर ती तुमची तुम्हाला तरी वाचतां येतील किंवा नाही, याची शंकाच आहे. बाबुर स्वभाषेचा सम्रा होता. तो नेहमी असे म्हणे की, राजाची भाषा ही भाषांची सम्राज्ञी असली पाहिजे. लोकांनी त्याच्या भाषेचा आणि बोलीचा आदर्श डोळ्यापुढे ठेविला पाहिजे. आणि खरोखरीच बाबुराची भाषा तशी होती, आणि दरबारी थाटदार भाषा तर त्यानेच लिहावी. हुमायूनसंबंधी त्याच्या मातेचे आणि बाबुराचे बोलणे चाललें असतां हुमायून एकाएकी त्या ठिकाणी अवतीर्ण झाला. उभय माता-पितांच्या हृदयाचे गुलाब फुले आणि नेत्रांत प्रेमाश्रु उभे राहिले. * शंभर वर्षांचे आयुष्य आहे तुला. आतांच तुझे स्मरण केले आणि बेटा तू भेटलास.' हुमायून भेटल्याबरोबर बाबुराचे पितृहृदय वात्सल्याने स्रवू लागले आणि वरील उद्गार त्याच्या तोंडातून बाहेर पडले. सम्राट्पदाची कठोरता मावळली. “ तुं परवानगीशिवाय कां आलास ? समरकंदच्या स्वारीचे काय झाले ?' वगैरे वगैरे प्रश्न पार कुठच्या कुठे गेले. त्याने त्या दिवशी फार मोठा दरबारी खाना हुमायूनव्या