पान:बाबुर.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हुमायूनसाठी बलिदान बाबुराच्या एकंदर चरित्रावरून तो मर्द होता, तसाच तो सभ्यही होता. थोरपणास उचित असे सर्व गुण त्याच्या अंगी होते. धूर्तता, विद्वत्ता, मेहनत, महत्त्वाकांक्षा, औदार्य, रासकता आणि सौंदर्यसमीक्षता, वगैरे बहुमोल गुणांनी तो युक्त होता. साधारणपणे राजपुरुषाहून बाबुर अगदी निराळा वाटतो. मानवी प्राण्यांत नैसर्गिक जे काय गुण असावयाचे ते त्याच्यांत भरपूर होते. तो चलाख, ममताळू व साधा असून मोठा अधिकार हाती आल्यावरही हे त्याचे गुण कमी झाले नाहीत. इतर राजांसारखा तो डामडौली नव्हता. त्याच्याजवळ राजे लोकांचा दरबारीपणा तर मुळीच नव्हता. कल्पकता व बहुगुणसंपन्नता ह्यांत त्याची बरोबरी करणारा राजा क्वचितच सापडेल. राजपुरुषाच्या अंगीं सहसा न आढळणारा मनामिळाऊपणा, मनाची तरतरी, विपत्ति येवो अथवा भाग्योदय प्राप्त होवो, दोन्हीही स्थितीत धैर्य ढळू न देतां आनंदी व शांत वृत्त ठेवणे हे तर त्याचे विशेष होते. ने डगमगणारे धैर्य, विद्याभिच तिच्यामध्ये मिळालेली सिद्धि इत्यादि गुणांमध्ये बाबुराचे तोडत बसेल असा बादशहा. क्वचितच सांपडेल. हुमायूनला पहिला मुलगा झाला त्या वेळी त्याने त्यास अभिनंदनपर असे एक पत्र ता. १३-११-१५२८ ला धाडले आहे. त्याने त्यांत त्यास बहुमोल