पान:बाबुर.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर बाबुराचा स्वभाव अत्यंत उमदा होता. त्याचे समरकंदवरील प्रेम बिनमोल होते. ते तीन वेळां त्याच्या हातांत आले आणि गेले पण त्याचा मोह बाबुरास सुटला नाहीं. बुखान्याचा मध व समरकंदची खरबुजे त्यास फार आवडत. समरकंदासच बाबुरास काव्यस्फूर्ति झाली व तो कविता रचू लागला. संकटांत असतांही बाबुराचा कवितेचा नाद सुटला नाही. तो दररोज सरासरी बावन्न श्लोक रचीत असे. बाबुराने एक लिपी काढून ती अमलांत आणिली. याच तुर्क लिपींत तो आपल्या कविता 'व इतर ग्रंथ लिहीत असे. ह्या लिपीस बाबरी लिपी म्हणतात. तो कवने करण्यांत फार सराईत होता. त्याचा मुलगा हुमायून काबुलास राज्य करीत असतां त्याने कांहीं कवने करून बाबुरास दाखविली, पण ती तितकीशी साधली नव्हती. तेव्हां बाबुराने त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. त्याचे त्याच्या सैनिकांवर फार प्रेम असे. तो स्वतःच्या शरिरापेक्षा त्यांची काळजी अधिक घेई. बाबुरास हिंदुस्थानांत एवढा मोठा विजय मिळाला त्याचे मुख्य कारण असे की, त्याने सैन्यास उत्तम प्रकारचे लष्करी शिक्षण दिले होते. त्याची टापटीप व शिस्त अवर्णनीय होती. पूर्वी लढाईच्या प्रसंगी निरनिराळ्या टोळ्या मर्जीस येईल त्याप्रमाणे हल्ला चढवीत, पण बाबुराने शबानीखानाशी गांठ पडल्यापासून ही पद्धत सोडली आणि सर्वांनी शिस्त वार आणि एकमताने लढण्याची नवीन पद्धत अंगिकारली.