पान:बाबुर.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इतर सत्ताधा-यांचा बीमोड | १२५ . हिंदुस्थानांत आल्यापासून त्याची प्रकृति तितकीशी बरी नव्हती. येथील इवा त्यास मानवेना, अधूनमधून त्यास ताप येई. त्याची शरीरसंपत्ति पहिल्यापासून खणखणीत म्हणूनच ती तग धरून होती. नाहींतर त्याच्यावर कोसळणारे ते आणीबाणीचे प्रसंग पाहिले म्हणजे तो त्यांतून कसा निभावला याचेच आश्चर्य वाटते. त्याचा उत्साह दुर्दमनीय होता. त्याच्यासारखा पोहणारा तर फारच क्वचित् आढळेल. मार्च इ. स. १५२९ तील त्याची नोंद अशी आहे की, गंगा नदीचे पात्र तेहतीस हात मारून तो पार झाला आणि थोडा वेळ विश्रांति घेऊन पुन्हां माघारी आला. या वेळपर्यंत त्याच्या भ्रमंतिमध्ये भेटलेल्या कोणत्याही नदीचे पात्र पोहून काढल्याशिवाय त्याने सोडले नव्हते. फक्त गंगेचे पात्र त्याने ओलांडले नव्हते, तेही पण आतां ओलांडले. याशिवाय शक्तीचा चमत्कार तो नेहमी करीत असे. तो असा की, दोन बगलेंत दोन माणसे उचलून खंदकावरून उड्या घेत तटबंदीस तो प्रदक्षणा घाली. यावरून बाबुराच्या ताकदीची सहज अटकळ करता येते. | बाबुरासारखा कृतज्ञ आणि उमदा पुरुष विरळाच सांपडेल, संकाटांत आपल्याबरोबर खांद्याशी खांदा लावून दिवस कंठणाच्या स्नेह्यांच्याबद्दल कृतज्ञता त्यांच्या अंतःकरणांत आकंठ भरली होती. इ. स. १५२९ च्या डिसेंबरमध्ये त्याने आपल्या स्नेह्यांस फार मोठा थाटाचा उद्यानोपहार दिला होता. त्याचा दिमाख आणि थाट त्याच्या बादशाही वैभवास शोभण्यासारखा तर होताच पण त्या प्रसंगी हजर असणा-या लोकांची यादी पाहिली म्हणजे त्याच्या स्नेह्यांचा विस्तार अचंबा वाटण्यासारखा होता. त्याच्या पायाशी पाय बांधून प्राणघातक संकटांना तोंड देणाच्या वीरांचा त्याने केलेला गुणगौरव हा तर केवळ अपूर्व होता. या वेळी पाहुण्यांच्या करमणुकीसाठी करण्यांत आलेले करमणुकीचे प्रकार अनेकविध होते. हत्तीच्या टकरी, उंटांच्या पळण्याच्या शर्यती, साठमारीचे खेळ, पेहेलवानांच्या कुस्त्या, गवयांची गाणी, कलावंतिणीचे नाच, जादूचे प्रयोग वगैरे गोष्टींची नुसती झुंबड उडाली होती.