पान:बाबुर.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इतर सत्ताधा-यांचा बीमोड । । १० राणा संगाच्या पाडावानंतर राजपूतांत कांहींच त्राण उरला नाही. ते एकामागून एक नाहीसे झाले. त्यांची सत्ता नामशेष झाली. राणा संगानंतर मेदिनीराय नांवाच्या एका सरदाराचा पाडाव करण्यात आला. माळवा आणि बुंदेलखंड यांच्या सरहद्दीवर चंदेरी नांवाचा एक किल्ला होता. तो मेदिनीरायाच्या ताब्यात होता. त्याच्यावर बाबुराची धाड आली, तेव्हां मेदिनीरायानें तो मोठ्या शौर्याने लढविला, पण निभाव लागत नाही असे पाहतांच त्यांनी शत्रूवर जोराची धडक घेऊन स्वर्गाची वाट धरली. बाबुराने ठिकठिकाणी नाकी बसवून बंदोबस्त चालविला. जे लोक या लांबच्या वस्तीला कंटाळले होते, त्यांची एक टोळी करून हुमायूनच्या हाताखाली त्यांस काबुलास पाठविलें. बदकशानच्या सुभ्यावरही हुमायूनची नेमणूक करण्यांत आली. इब्राहिमखान लोदीचा मुलगा शहाजादा महंमद हा फार मोठ्या फौजेसह बंगाल प्रांतांतुन काशीपर्यंत चालून आला. पण बाबुर सामना देण्यासाठी समीप येतांच त्याच्या लोकांनी त्यास सोडून दिले व हे प्रकरण जागच्या जागीच निकालांत निघाले. याच वेळी त्यानें बंगालच्या राजाचा पराभव केला. अयोध्या प्रांतांतील बडे मोडून जिकडे तिकडे शांतता प्रस्थापित करून तो आग्न्यास माघारी आला.