पान:बाबुर.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० | बाबुर । मिळाले. त्यांनी तर राजपुतांच्या शौयांची रसभरित वर्णने सुरू केली. त्यामुळे बाबुराचे लोक आणखीच घाबरले. राणा संगाच्या सैन्यास सतावून सोडण्यासाठी म्हणून धाडलेल्या टोळ्या जोराचे रट्टे खाऊन माघारी येऊ लागल्या. इतक्यांत काबुलहून एक रमलज्ञ आले, त्यांनी बाबुराचा पराभव होणार असे खडान्खडा भविष्य वर्तविले, त्यामुळे लोकांचा धीर जास्तच खचू लागला. हे मरगळीचे वातावरण नाहींसे व्हावयास पाहिजे होते. नवे चैतन्य, नवा जोम निर्माण झाल्याविना भागणार नव्हते, तेव्हां बाबुराने एकदम पवित्र बदलला. अहोरात्र चिंतन सुरू केले. असें कां होते ? कोठे काय चुकत असावे ? असल्या घनघोर प्रसंगांनी आपला एकसारखा पिच्छा कां पुरवावा ? हे नाही ते, तें नाहीं हें असे करता करतां विचारांची मालिका पूर्ण झाली आणि त्याच्या शरीरांत एकदम संचार होऊन तो मनाशीच पुटपुटला : * दारुड्या बाबुराला जय येणार नाही. ईश्वरी वाणी ईश्वरी नियमाने सिद्ध होते. झालें. एकदम आचरणांत क्रांति झाली, बाबुरानें-ह्या पट्टीच्या दारूबाजाने एक तपानंतर ती एका क्षणांत सोडली ती कायमची. सध्या बाबुराने आपला तळ दिल्लीपासून दहा कोसांवर फत्तेपूर शिक्री या ठिकाणी दिला होता. त्वेषाच्या लहरींत बाबुराने दारू न पिण्याचा कृतनिश्चय केला. मदिरेचा साठा रस्त्यांत फेकून दिला. मदिरापानाचीं भांडी मोडून तोडून टाकली, आणि दारूची बंदी सर्व लष्करांत जारी केली. सर्वीस बोलावून मोठे तेजस्वी भाषण केलें :-..

    • सद्गृहस्थहो, मरण हे प्रत्येकालाच आहे, पण मरणामरणांत परी आहेत. मुंगुरट्याच्या मरणाने मरणे आणि शेराच्या मरणाने मरणे यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे. शत्रूशी दोन हात करता करतां दुनियेपार होण्यांत पुरुषार्थ आहे, परम सौभाग्य आहे, अन्त सद्गति आहे. आणि जय झाला तर साम्राज्य आपलें आहे, आणि मग या साम्राज्यावर सत्ता गाजविणारे महंमदी धर्माचे साम्राज्य चिरंजीव होणार आहे. पिढ्यानपिढ्या न लाभणारी