पान:बाबुर.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कानवाची लढाई ११९ बाबुर या सर्व गोष्टी दुरून पहात होता. राणा संगाच्या हालचालींस एवढे तेज चढेल आणि ते इतक्या झपाट्याने आपणापुढे दंड ठोकून खळ्या खणत उभा राहील, अशी त्याची कल्पना नव्हती. बाबुर राजपुतांच्या या तयारीने घाबरला. त्याचे सामर्थ्य त्या मानानें कोते होते. तो परदेशांत नवीन आला होता. शिवाय पानिपतावर झालेल्या इब्राहिमखान लोदीच्या घनघोर संग्रामांतून तो मोठ्या शिताफीने बाहेर पडला होता. इतर अफगाण लोकांना मोडण्याचे काम चालू होते. येथील नव्या राहणीस कंटाळलेल्या सैनिकांची धुसफूस चालू होती. अशा अस्थिर परिस्थितीत तो होता तोच हे संकट आले. ‘पण संकट आले असतां गांगरून जाणे हे तर बाबुराच्या स्वभावांतच नव्हते. उलट ज्या ज्या मानाने लहानमोठे संकट येईल त्या त्या मानाने त्याचे मनोधैर्य बलवान् होऊन येणाच्या संकटाशी झुंज घेण्यास तो तयार असे. त्याने आपल्या परीने तयारी चालविली. आतापर्यंतची युद्धे बाबुराने स्वधर्मीयांशी केली. मुसलमानांतील भिन्न भिन्न जातींच्या लोकांशी त्याचे सामने झाले. मोगलांची युद्ध-पद्धत त्याला माहीत होती. अफगाण लोकांची चकमक तो जाणीत होता. उझबेग लोकांची तुलुघमा-पद्धतीची लढाई त्याच्या चांगल्याच परिचयाची होती. त्यांत तो स्वतः तरबेज होता. त्या युद्ध-पद्धतींत तोफखान्याची भर घालून ती त्याने हिंदुस्थानांत चांगलीच प्रभावी केली आणि तुर्की लोकांची धीमी लढाई त्याने पाहिली होती. पण सध्या ज्या लोकांशी त्याची सामना व्हावयाचा होता ते राजपूत लौकिकवान् होते. त्यांच्यामागे शेंकडों ? वर्षांची संस्कृति होती व खातरजमेचे योद्धे म्हणून त्यांची कीर्ति होती. एवढ्या मोठ्या पल्याचे युद्ध करण्याची त्याची तयारी नव्हती पण तो कार्यास लागला होता. लष्कराची पूर्णपणे सिद्धता होता व तो या स्वारीवर चालू लागला. प्रथम त्याची पंधराशे लोकांची एक तुकडी राण। संगाच्या सेनेवर चालून गेली; पण तिचा धुव्वा उडाला, सरसहा कत्तल झाली • त्याबरोबर बाबुराचे लोक आणखीच धास्तावले. मेवाड व दिल्ली या राज्यांची सरहद्द बिना नदी होती. त्या ठिकाणी त्यास कांहीं अफगाणी सैन्य येऊन