पान:बाबुर.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कानवाची लढाई बघता बघतां या लढाईस धर्मयुद्धाचे रूप आले आणि तो त्वेष उभयपक्षांत सणाणू लागला. जिकडे तिकडे चैतन्य निर्माण झाले. राणा संगाच्या झेंड्याखाली या आणीबाणीच्या प्रसंगी सर्व हिंदू एक व्हावा, सर्वांनी एका आवाजाने याला उत्तर द्यावे, अशा भावना उफाळू लागल्या. राणा संगाने सर्व हिंदु राजराजेश्वरांना या प्रसंगी बोलाविले आणि युद्धाची सिद्धता जोराने चालविली. या लढाईसाठी दोन लाख सैन्य तर खासच जमा झाले होते. भिल्साच्या राजाचे ३०००० घोडेस्वार; मेवाड, डोंगरपूर आणि चंदेरी या ठिकाणांहून प्रत्येकी बारा हजार बरकंदाज लढवय्ये आले होते. * मारू किंवा मरू' या अहमहमिकेनें जो तो त्या ठिकाणी दाखल झाला होता. बाका प्रसंग येतांच पळापळ होऊन लढाई बिघडण्याचा बिलकूल संभव नव्हता. जो तो निधड्या छातीचा वीर होता, आणि छातीचा कोट करून धर्मासाठी पंचप्राणांची कुरवडी करण्याचे त्यांनी ठरविले होते. या शिवाय इब्राहिमखान लोदीच्या दिल्लीच्या सिंहासनावर वारसा हक्क सांगणाच्या त्याच्या भावाचे-महंमदखान लोदीचे १०००० सैन्य राणा संगाच्या बाजूस होते.