पान:बाबुर.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राणा संग - ११७ vwww m दोघांच्या संगनमताने झाली आणि त्या वेळी देण्यांत आलेले अभिवचन पाळण्यात आले नाहीं असे जर तो म्हणता तर ते मान्य होण्यासारखे होते. राणा संग अशी रास्त तक्रार करतो की, बाबुराने काल्पी, घोलपूर व आग्रा हीं ठाणी आक्रमून त्याच्या सत्तेवर अतिक्रमण केले होते. उभयपक्ष तक्रारी चालू होत्या आणि ही प्रकरणे हातघाईवर येणार होती. फक्त दिवस केव्हां उगवणार हाच काय तो प्रश्न होता.