पान:बाबुर.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ * बाबुर ««««««««««««««««««««««««««« आणि अबू या ठिकाणचे राजे राणा संगाचे मांडलिक होते. असा हा फार मोठा मातबर होता. बाबूर दिल्लीस आला नसता व आल्यानंतर स्थाईक झाला नसता तर बाबुराचे नी त्याचे बिनसले नसते व हा युध्द प्रसंगच आला नसता. बाबुराची आणि त्याची लढत तो तरुण असतांना झाली असती तर काय झाले असते हे सांगता येत नाही. त्याने मुसलमानांचा रणांगणावर अठरा वेळां पराभव केला होता, त्याच्या शरीरास रणांगण समशेर गाजवीत असतां असंख्य जखमा झाल्या होत्या. त्यांपैकी अँशींचे वण मोजतां येतील अशा स्थितीत होते. त्याचा डोळा, हात व पाय निकामी झाले होते. तरी पण त्याच्या अंगांतील तडफ व मनगटांतील शत्रूला जाऊन भिडण्याची रंग पहिल्या दिवसाइतकीच टणक होती. बाबुरासारखा बलाढ्य शत्रु आपल्याजवळ स्थाईक होत आहे असे पाहताच राणा संगानें आपलें धोरण बदललें व बाबुरास उखाड देण्याची तयारी चालविली. राणा संग आणि बाबुर या दोन महान् व्यक्ति होत्या. दोघांचे चरित्र आणि चारित्र्य तितकेच उदात्त आणि पवित्र होते. उभयतांनी आपल्या प्रखर कर्तबगारीच्या योगानें कीर्तिमंदिर निर्माण केले होते. तेव्हा या उभयतांची रणांगणावरील गांठ म्हणजे तो एक अपूर्व योग होता. दोन्हीही प्यादी एकमेकांस भारी होती. बाबुर काबुलास असतांना संग राण्याने त्याच्याकडे वकील पाठवून त्याची मैत्री संपादन केली होती. त्या वेळी उभयतांमध्ये असे बोलणे झाले होते की, बाबुर एका बाजूने दिल्लीवर चाल करून आल्यास तो स्वतः दुस-या बाजूने आग्यावर चाल करून येण्यास तयार होता; पण आतां बाबुराचे म्हणणे असे की, तो स्वतः इब्राहिमखान लोदीवर चाल करून आला, त्याने दिल्ली व आग्रा या शहारांचा ताबा घेतला तरी सुद्धां संगाकडून कोणत्याच प्रकारची हालचाल झाली नाहीं, अतएव त्याने आपला शब्द पाळला नाही. या तक्रारीत फारसे तथ्य दिसत नाही. कारण ही स्वारी