पान:बाबुर.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राणा संग ३८ । अफगाण सरदारांची बंडे मोडण्याचे काम चालू होते तोंच बाबुरास दुस-या एका प्रबल योद्धयास तोंड द्यावे लागले. तो म्हणजे चितोडचा राणा संग. हा फार नामांकित पुरुष होता. त्याचे घराणे राजपूतांत सर्वश्रेष्ठ होते. बाबुराप्रमाणेच अनेक संकटांना तोंड देऊन आपला मोठेपणा त्याने निर्माण केला होता. अखिल भारतवर्षात त्याच्या नांवाला फार मोठी किंमत होती. त्याच्या झेंड्याखाली हांकेबरोबर लक्षावधि सैन्य जमा होत होते आणि अनेक शत्रूना खडे चारीत होते. चितोडच्या गादीवर आल्यापासून त्याने अ पला राज्यविस्तार फार वाढविला होता. हे बाबुरी संकट आले नसते तर त्याची सत्ता साम्राज्यपदास पोचली असती, माळवा प्रांताचा राजा सुलतान महंमद खिलजी याचा पराभव करून त्याने त्याचे राज्य जिंकले होते आणि महंमद खिलजीलापराजित शत्रूला मोठ्या मानाने वागवून राजपुती औदार्याचे उदाहरण जगाला दाखवून दिले होते. भिलसा, चंदेरी, सारंगपूर आणि राठोर व माळवा एवढ्या मोठ्या प्रदेशावर त्याचा राज्यविस्तार होता. बाबुर हिंदुस्थानांत येण्यापूर्वी याचा त्याच्याशी पत्रव्यवहार झाला होता. एकमेकांनी एकमेकांस मदत करण्याचे ठरले होते. त्याने दिल्लीच्या इब्राहिमखान लोदीचा अनेक वेळा पराभव केला होता. मेवाड, अंबर, ग्वाल्हेर, शिक्री, चंदेरी, काल्पी, बुंदी, रामपूर,