पान:बाबुर.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ बाबुर बाबुराच्या या भाषणाने सैनिकांनी घरी जाण्याची भाषा बंद केली पण अप्रसन्न मनाने ते राहू लागले. सर्कशींतील सिंह मालकाची करडी नजर असेपर्यंत गुरगुरत काम करतो पण तो केव्हां बिथरेल त्याचा नेम नसतो. सिंहाचे काम संपेपर्यंत मालकाचा जीव धोक्यात असतो; पण बाबुराची ही सर्कस चोवीस तास चालू होती. तिचे प्रयोग हिंदुस्थानांत चालू होते. त्याच्याभोंवतीं लष्कररूपी गुरगुरणाच्या नरसिंहांचा गराडा होता. त्याचा जीव चोवीस तास धोक्यांत होता. पण त्याच्या अलोट धैर्याने तो यांतूनही मार्ग काढीत होता. एकेक दिवस काढावा तो तो त्याचा मार्ग सुकर व्हावा असे चालले होते, बाबुराच्या गोड वागणुकीनेच त्याची संकटें प्रतिदिनी निवारू लागली. बाबुराच्या पूर्वी हिंदुस्थानावर चाल करून येणारे महंमद गझनी, तैमूर व बाबूर यांच्या स्वाध्यांत भयंकर तफावत होती. महंमद गझनी व तैमूर एखाद्या सैतानाप्रमाणे आले. कचाकचा त्यांनी येथील लक्षावधि लोकांची मुंडकी तोडली, अलोट संपत्ति नेली. सोसाट्याच्या वा-याप्रमाणे ते आले आणि गेले. त्यांच्या ह्या करणीस फार मोठ्या प्रमाणांतील डाकेगिरीचे रूप होते. बाबुराचे मात्र तसे कांहीं नव्हते. तो येथे राज्य करण्यासाठी आला होता. त्याला लूट-मार करून माघारीं जावयाचे नव्हते. तो येथे स्थिर झाला आणि त्या दृष्टीने मांड मांडू लागला. त्याबरोबर लोकांची दृष्टि बदलली. ते त्याच्याकडे तुलनेच्या दृष्टीने पाहू लागले, त्याबरोबर पूर्वीच्यांत आणि बाबुरांत जमीन-अस्मानाचे अंतर दिसू लागले. पूर्वीच्यांनी लोकांच्या कत्तली निष्कारण केल्या तर बाबुराने तसला क्रूरतेचा प्रकार कोठेच केला नाही. तो शूर होता, पराक्रमी होता आणि इब्राहिमखानानंतर त्याच्या तोडींत बसेल असा बाबुराइतका कोणीच पराक्रमी दिसत नव्हता. तेव्हां इब्राहिमखानानंतर हाच राजा बरा असे लोकांस वाटू लागले. द्वेषाची भावना मावळू लागली. इब्राहिमखान लोदीच्या अमदानीताल अफगाण सरदार व सुभेदार एकामागून एक बाबुरास सामील होऊ लागले. जे कांहीं थोडे बंडखोर होते त्यांचा बंदोबस्त हुमायूनने केला,