पान:बाबुर.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनाहूत संकट ११३ या नव्या लोकांवर भामटेगिरीचे छापे घालून व चोच्या करून दिल्लीच्या भामट्यांनी त्यांस सतावून सोडिलें. जवळ पैसा असून अन्न-पाणी मिळेना की निवा-यास निर्वेध ठिकाण मिळेना. त्यामुळे त्यांची आंतून-बाहेरून गळचेपी सुरू झाली. त्याबरोबर त्यांचे चित्तस्वास्थ्य नाहीसे झाले आणि त्यांच्या दृष्टिसमोर त्यांचा तो काबूल-कंदाहारचा थंड प्रदेश, त्यांची सुखदायी घरे व त्या घरांत स्वर्गीय आनंद देणारी गृहलक्ष्मी आणि तिच्या आवतभोंवतीं बागडणारी गोंडस बालके आपल्या इवल्याशा करकमलांनी त्यांस बोलावू लागली. त्याबरोबर त्यांच्या हृदयावर सत्ता गाजविणा-या त्या बालसम्राटांच्या आज्ञेपुढे बाबुराची, या नूतन सम्राटाची सत्ता त्यांस नकोशी वाटू लागली. त्यांच्या मनावरील बाबुराची पकड ढिली पडली आणि त्यांनी साफच सांगण्यास सुरुवात केली की, झालें एवढे बस्स झालें; आम्हांस घरी जाण्यास हुकूम व्हावा. ही साथ हां हां म्हणतां सर्व सैन्यभर पसरली. ही मागणी एकमुखी येणार अशी कानगी बाबुराच्या कानी आली. | हे वेडे पीक पिकलें तर त्यांतून तोड निघणे मुष्किलीचे होणार हैं तो जाणून होता. तेव्हां त्याने त्यांना एक दिवस बोलावून सर्व लष्करापुढे जिव्हाळ्याचे भाषण केलें : ५८ पराक्रमशाली दोस्तांनो ! आजपर्यंत आपण खांद्याशी खांदा लावून अनेक प्राणघातक वावटळींतून आणि शरिराची गुडाखू करणा-या बर्फाच्या बेसुमार मान्यांतून प्रवास केला. खाईन खाईन करीत आलेल्या संकटांना तोंड दिले आणि हिंदुस्थानांत येऊन लक्षावधि फौजेनिशी कोसळणाच्या शत्रूच्या ठिकन्या उडविल्या, आणि आपलें साध्य आपण साधिलें. भारतवर्षाचे साम्राज्य आपल्या चरणावर लोळत आले आहे. तेव्हां ते टाकून एखाद्या भ्याडागत माघारीं घराला पळून जाणे तुम्हांला शोभत नाहीं, बायकां-पोरांच्या लेदारांत रममाण होणारी श्वान-मूक पुष्कळ असतात. तेव्हां असले मुर्दाड जीवन पत्करणार का येथील साम्राज्याचे मानाचे मानकरी म्हणून दिमाखाने वावरणार ? घराची आणि काबूल-कंदाहारची भाषा बोलू नका. जरा धीर धरा. संकटें नाहींशी होतील, सुखाचे दिवस येतील.