पान:बाबुर.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनाहूत संकट बाबुराने आपल्या संपत्तीची वांटणी मुक्तहस्ताने केली. जो जो त्याच्या उपयोगी पडला त्याला त्याला या नाहीं त्या प्रकाराने त्याने कांहीं ना कहीं पोचविले आणि सर्वांचा दुवा घेतला. खुद्द बाबुरासही आपण दिल्लीच्या तख्तावर तख्तनशीन झालो म्हणून समाधान वाटले, शहानशहा होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा अनेक संकटांना तोंड दिल्यानंतर तडीस गेली. स्वतः कर्तबगारीने छोटेसे घर बांधले तर मिशाला पीळ भरून मनुष्य छाताड वर काढून हिंडतो; मग बाबुर तर बादशहा झाला होता. तो सुद्धा वडिलार्जित राज्याचा नव्हे तर स्वतःच्या पराक्रमाने संस्थापिलेल्या परदेशांतील राज्याचा, तेव्हां त्याची अपूर्वाई त्यास विशेष वाटावी हे साहजिकच होते. कोणतीहि गोष्ट मिळविणे हे तर कठीण आहेच पण मिळविलेली गोष्ट टिकविणे हे त्याहीपेक्षां कठीण. आतां तो अनुभव बाबुरास येऊ लागला. त्याने दिल्ली शहरांत प्रवेश केला त्या वेळी उन्हाळा होता, आणि तो दिल्लीचा कडक उन्हाळा होता. तो बाबुराच्या थंड हवेत राहणा-या लोकांना अत्यंत जावू लागला. त्यांतून नागरिकांची सहानुभूति अजिबात नाही. त्यांची कवाडे या लोकांना पाहतांच बंद होत. त्यामुळे प्रतिक्षणी लागणाच्या गरजा भागेनात, इतकेच नव्हे तर