पान:बाबुर.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कालंदर । लक्षांत होत्या आणि सुदैवाने आतां त्याला संपन्नता आली होती तेव्हा त्याने हुमायूनला त्या वेळचे नाणे ७० ० ० ० ० ० ( सत्तर लाख ) दाम बक्षीस दिले. त्याने आपल्या बेग सैनिकांमध्ये दहा लाख दाम वांटले. सैन्याच्या तळाबरोबर व्यापार करणारे व्यापारी व बाजारबुणगे यांनासुद्धा त्यांच्या मानाप्रमाणे बक्षिसे देण्यात आली. फर्घाना, खुरासान, काशघर आणि पर्शिया या ठिकाणी राहणा-या स्नेह्यांस बाबुराने सोने, रुपें, जडजवाहीर, मौल्यवान् कपडे व इकडे सांपडलेले गुलाम नजराणे म्हणून धाडिले, हिरात, समरकंद, मक्का, मदिना या पवित्र ठिकाणच्या मौलानांना व काजींना या प्रसंग बक्षिसे धाडण्यांत आली. बाबुराने सुलतान इब्राहिमखानाच्या आईस सात लाखांचा एक प्रांत तोडून देऊन तिची व्यवस्था चांगल्या प्रकारे लावली. बाबुरचे हे सौजन्य लक्षात ठेवण्यासारखे आहे. बाबुराने स्वपराक्रमाने मिळविलेली ही संपदा भसाभस वांटून टाकली. आतां त्याच्याजवळ फक्त कोहिनूर राहिला. तोसुद्धा त्याने हुमायुनास देऊन टाकिला. त्याच्या या अवलिया वृत्ती मुळे त्याचे कालंदर म्हणून नांव त्या वेळी महशूर झाले होते.