पान:बाबुर.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० बाबुर १५:५६, १९ नोव्हेंबर २०१८ (IST)१५:५६, १९ नोव्हेंबर २०१८ (IST)१५:५६, १९ नोव्हेंबर २०१८ (IST)~ दाणकन् उताणाचा उताणा फेकून देतो. बरोबर तोच प्रकार या युद्धांत झाला. बाबुराचे सैन्याला शिस्त होती. त्याचे खंदक, झाडांच्या फांद्या जमीनीवर टाकून त्याच्या आश्रयाने शत्रूस अडविण्याची युक्ति, तसेच शत्रूची पाठ अचानकपणे सडकून काढून तो गांगरला की त्यास पुढून ठेचणे व नंतर डाव्याउजव्या बगला दाबून त्याला मोडून काढण्याची तुलुघमा युद्ध-पद्धति व अजस्र तोफखाना; आणि या सर्वांवर मात करणारी गोष्ट म्हणजे डोळ्यांत तेल घालून विद्युल्लतेच्या चापल्ल्याने रणांगणावर हालचाली करणारा बहादूर सेनानी. या सर्व गोष्टींच्या समुच्चयानेच बारा हजार सैनिकांनी एक लाख लोकांचा निःपात केला. पांच-सहा हजार प्रेतांचा खच पडला होता, त्यांत इब्राहिम लोदीचा मुडदा सांपडला. त्याचे डोके कापण्यांत येऊन ते बाबुरास नजर करण्यांत आले. रणांगणावर पंधरा-सोळा हजार लोक कामास आल्याची आवई होती, पण आग्यास जाऊन चौकशी करतां पानिपताच्या रणभूमीवर पन्नास-साठ हजार लोक प्राणास मुकल्याचे समजलें, विक्रम नांवाचा ग्वालेरचा हिंदु राजा इब्राहिमखान लोदीच्या मदतीसाठी आला होता, तोही पानिपतावर मरण पावला. अशा त-हेनें निरवानिरव होऊन दिल्लीचे सिंहासन रिकामे झाले. गुरुवार अठ्ठावीस एप्रिल पंधराशे सव्वीसला बाबुराने आपल्या सैन्यासह मोठ्या थाटाने दिल्लीत प्रवेश केला. सुलतान इब्राहिमच्या राजवाड्यांत त्याचे वास्तव्य सुरू झाले. मशिदीत त्याच्या नांवानें खुदवा सुरू झाला. अपूर्व तेजानें झळकणाच्या त्याच्या भाग्यास खुलवणाच्या पृथ्वीमोलाच्या कोहिनूर हिन्याची प्राप्ति त्यास याच वेळी झाली. तो त्यास त्याच्या थोरल्या पुत्रानेहुमायूनने या प्रसंगी नजर केला. या वेळी बाबुराच्या स्वारीत हुमायून हेाता पण त्याचा दर्जा आणि जामानिमा तो बाबुर बादशचा युवराज, बावुरान संस्थापिलेल्या साम्राज्याचा भावी सम्राट् या थाटाचा नव्हता; तर एकाद्या सामान्य सेनानी प्रमाणेच त्याची वागणूक होती. ह्या सर्व गोष्टी बाबुराच्या