पान:बाबुर.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कालंदुस् । बाबुराच्या हाती आलेले यश फारच अपूर्व होते. शत्रूचा धुव्वा उडाला आणि लगेच दिल्ली व आग्रा या दोन शहरांचा ताबा घेण्यासाठी दिल्लीवर त्याच सैन्ये रवाना झाली. त्यांनी त्या शहरांचा ताबा घेतला. तेथील मशिदीतून बाबूर बादशहाच्या नांवाने, या पहिल्या मोगल शहानशहाच्या नांवाने पहिली प्रार्थना शुक्रवार ता. २७ एप्रिल इ. स. १५२६ ला म्हटली गेली. या संग्रामांत इब्राहिम लोदीचे एवढे मोठे सैन्य पण ते जें चुटकीसरशी निकालांत निघालें त्याची कारणमीमांसा नीट लागत नाहीं. इब्राहिमखान लोदीच्या सैन्यांत फितूर होता, रणांगणावर त्याचे सैन्य त्याला सोडून गेले असे मात्र झालेले दिसत नाहीं. ते शेवटपर्यंत प्राणपणाने लढले. मग असे अपयश कां आले ? त्याला मुख्य कारणे दिसतात ती अशी की, पैलनवानास अजस्र बोजा आणि अचाट सामर्थ्य असून भागत नाहीं; त्याला डावपेंचांची जोड लागते तरच आखाड्यांत कुस्ती यशस्वी होते. नाही तर पुष्कळ वेळां लुकडा दिसणारा पहिलवान दुपटीतिपटीच्या गड्याला पिरगाळून टाकतो. बांधेसूद पैलवानाचे शरीर अगाबरोबर असल्याकारणाने त्याच्या हालचाली तल्लख असतात. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तो आपला डाव यशस्वी करतो आणि प्रतिस्पध्र्यास