पान:बाबुर.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ बाबुर करण्यांत आली, थोडीशी गडबड झाली, अंधःकारांत सैन्यास व्यवस्थितपणे हालचाली करता येईनात म्हणून सैन्य झदिशीं माघारी फिरले. पण ता, २१ ला मात्र लढाईस तोंड लागले. दिवस भालाभर आकाशांत चढला असेल नसेल इतक्यांत इब्राहिमअल्लीचे सैन्य समोरून येतांना दिसले. त्याबरोबर बाबुराने आपल्या सैन्यास इशारत दिली आणि सैन्थे एकामेकांस भिडली. इब्राहिमअल्लीचे सैन्य संख्येने मोठे होते, पण त्यास लष्करी डावपेंच माहीत नव्हते. इब्राहिमचे सैन्य एकाद्या रानडुकराच्या मुसंडीप्रमाणे जे सरळ निघालें तें बाबुराच्या सैन्यावर आदळले. त्याला शिस्त नव्हती की कांहीं विवक्षित तव्हेच्या हालचालींची बद्धता नव्हती. बाबुरच्या सैन्याच्या दसपटीने मोठ्या सैन्याचा लोंढा बाबुराच्या सैन्यावर आला, पण त्याने रचलेल्या व्यूहांत तो पूर्णपणे गुरफटला. पोत्यांत एखाद्या घुशीला गांठून टिकारण्याने ठोकावी त्याप्रमाणे बाबुरच्या सैन्याने इब्राहिमअल्लीच्या सैन्याची दशा केली. एक लाख फौजेनिशी अंगावर कोसळलेल्या शत्रूचे दुपारी बारालाच बारा वाजले आणि बाबुराने हा पानिपतचा घनघोर संग्राम जिंकला. त्याच्या आयुष्यात एवढे मोठे यश आणि एवढ्या अल्प काळांत त्याला में प्रथमच लाभले.