पान:बाबुर.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पानिपत होते. तसेच डाव्या आणि उजव्या बगलेच्या टोकांस चारही बाजूंनीं शत्रूला वर्तुलाकार वेढून त्याची पिछाडी व आघाडी साफ करून टाकणान्या तलुघमा लढाईच्या डावपेचांत तरबेज असलेल्या मोगल लोकांची एक राखीव तुकडी त्याने मुद्दाम ठेविली होती. या पद्धतीने आपल्या सैन्याची मांडणी करून बाबुर पानिपतच्या रणभूमीवर खडा होता. बाबुराचे हे सर्व सैन्य अनेक महिन्यांच्या प्रवासानंतर या रणभूमीवर दाखल झाले होते. त्यांचा देश व बायका-पोरे फार दूर होती. हे परागंदा होऊन पानिपत च्या रणभूमीवर मृत्यूशी खेळ खेळण्यासाठी जय्यत तयारीने उभे होते. पानिपतावर जय झाल्यानंतर दिल्लीचा बादशहा बाबुर होणार होता. पण सैनिकांना त्याचे काय ? त्यांच्या कपाळाची हडेलहप्पी थोडीच टळणार होती १ तेव्हां ह्या सैनिकांचा उत्साह एकसारखा ताजातवाना ठेवून त्यांच्याकडून यशस्वी त-हेनें काम करून घेणारे बाबुरासारखे सेनानी हे खरोखरच अलौकीक सामर्थ्याचे पुरुषश्रेष्ठ होत. त्यांची आकर्षक शाक्त कांहीं न्यारीच असते. बाबुराचे सैन्य आणि सुलतान इब्राहिमचे सैन्य समोरासमोर आठवडाभर होते; पण कोणीच कोणावर चाल करून जाईना की कांहींच आगळीक होईना. बाबुराचे लोक मनांतून भीत होते, कारण त्यांना या लोकांचा कांहीच अनुभव नव्हता. त्यांच्या या दिल्लीश्वराच्या सैन्यासंबंधी कल्पना फार दांडग्या होत्या. हे कांहीं तरी फार मोठे प्रस्थ असेल आणि त्यांतून आपण निभावून निघणार नाही असे त्यांस वाटत होते, पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा बाबुराच्या लोकांस विश्वास वाटू लागला. बडें घर आणि पोकळ वांसा अशांतील हा प्रकार आहे हे त्यांनी जाणले आणि एक दिवस खरोखरीच बाबुराच्या सैन्यांतील काही लोकांनी जाऊन त्या सैन्याची आगळीक केली. तरी सुद्धा ते सैन्य थंडच. तेव्हा मात्र खात्रीच पटली की, हे प्रकरण आपण खास हाणू. अशा त-हेने बाबुराच्या सैन्यांत दांडगा आत्मविश्वास निर्माण झाला. ता. २० एप्रिल इ. स. १५२६ ला रात्री सुलतान इब्राहिमच्या सैन्यावर चाल