पान:बाबुर.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर खलिता देऊन मुल्ला मुशिद नांवाचा एक वकील त्याने सुलतान इब्राहिमखानाच्या दरबारी धाडला. तसेच पंजाबचा सुभेदार दौलतखान यालासुद्धां पत्रे देण्यात आली. बाबुराचा वकील गेला आणि आला. त्याचा मुक्काम लाहोरला झाला. तेथे त्याने जवळजवळ सहा महिने काढिले, पण दौलतखान म्हणजे दौलतखानच होता. बाबुराचा वकील आला पण दौलतखान आपल्या सुभेदारांच्या मदांत धुंद. लाहोरसारख्या ठिकाणी हा बाहेरील मनुष्य येतो कोण, तो कशाकरितां आला, त्याने खलिते कोणाचे आणिले आहेत आणि त्यांत काय मजकूर आहे, वगैरेची कांहीं एक चौकशी न करतां व त्यास कोणत्याहि प्रकारचा निकाल न देता त्याने त्यास लाहोरातच खितपत ठेविल; इब्राहिमखानाकडेही जाऊ दिले नाही. पांच-सहा महिन्यांनंतर कोणत्याहि प्रकारचा निर्णय न घेतां तो वकील माघारीं गेला. ह्यानंतर चार-पांच वर्षांचा काल तसाच गेला. त्याला हिंदुस्थानकडे लक्ष देण्यास अवसर सांपडला नाहीं. इ. स. १५२० त तो पेशावरपर्यंत आला होता, पण बदकशानला कांहीं गडबड झाली म्हणून त्याला माघारी जावे लागले, आणि बदकशान त्याच्या ताब्यात आले. नंतर इ. स, १५२२ त कंदाहार त्याच्या अमलाखाला कायमचे आले. त्याच्यावर त्याने आपला दुसरा मुलगा कामरान याची स्थापना केली. समरकंदच्या क्रान्तीनंतर दहा-बारा वर्षांचा काल अत्यंत धामधुमीत आणि अस्थिर अशा परिस्थितीत गेला. इ. स. १५२६ च्या एप्रिलमध्ये त्याने इब्राहिमखानाशी पानिपतावर गांठ घातली आणि ज्याच्या एक लाख फौजेचा केवळ चार-सहा तासांत खुद केला. हा चमत्कार त्या काळाच्या दृष्टीने अजब झाला यांत तिलप्राय शंका नाहीं. या वेळी बाबुराने आपल्या सैन्याची रचना फार बहारीची केली होती. पानिपत गांव त्याच्या उजव्या बगलेला होते. त्याच्या सैन्याचा मध्य तोफांना आणि तयार गोलंदाजांनी व्यापला होता. डाव्या बाजूला खंदक खणण्यांत आल होते आणि सैन्याच्या रांगेत एका बाणाच्या टप्प्याइतकें अंतर ठेवण्यांत आले